Join us
Daily Top 2Weekly Top 5

लॅपटॉप, मोबाईल चोरांची टोळी अटकेत

By admin | Updated: February 2, 2016 03:48 IST

शहरातील घरे फोडून लाखोंच्या घरफोडीसह गर्दीचा फायदा घेत मोबाईल, दागिने लंपास करणारी सराईत चौकडीच्या सायन पोलिसांनी मुसक्या आवळल्या.

मुंबई : शहरातील घरे फोडून लाखोंच्या घरफोडीसह गर्दीचा फायदा घेत मोबाईल, दागिने लंपास करणारी सराईत चौकडीच्या सायन पोलिसांनी मुसक्या आवळल्या. बबुआ उर्फ आशीष साहेबलाल गुप्ता (२१), सिद्दीकी सलीम शेख (२०), बब्बू उर्फ फईम सलीम शेख (२३), चिंटू उर्फ नवाज अन्सारी (२४) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांच्याकडून १ लॅपटॉप आणि ११ मोबाईल जप्त करण्यात आले आहेत.सायन परिसरातही वाढत्या घरफोडीच्या गुन्ह्यांमुळे सायन पोलीस ठाण्याचे सहा. पोलीस निरीक्षक संतोष गायकवाड, अंमलदार धनराज पाटील, राजेश सावंत, प्रवीण सोनावणे आणि लक्ष्मण लोंढे या पथकाने आरोपींचा शोध सुरु केला. ही चौकडी धारावी परिसरात राहत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार शनिवारी सापळा रचून या चौकडीला अटक करण्यात आली. (प्रतिनिधी)