Join us
Daily Top 2Weekly Top 5

जमीन बळकावण्याचा डाव फसला

By admin | Updated: October 3, 2014 02:29 IST

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची (एमएमआरडीए) कुर्ला (प.) येथील सुमारे 41,37क् चौ. मीटर जमीन बळकावण्याचा एका पक्षकाराने रचलेला डाव मुंबई उच्च न्यायालयाने उधळला आहे.

मुंबई : 22 सप्टेंबर 1958 या तारखेने केलेल्या एका तद्दन बनावट खरेदीखताच्या आधारे मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची (एमएमआरडीए) कुर्ला (प.) येथील सुमारे 41,37क् चौ. मीटर जमीन बळकावण्याचा एका पक्षकाराने रचलेला डाव मुंबई उच्च न्यायालयाने उधळला आहे.
सीटीएस क्र. 8 ए व 8 बी परीघ खादरी, कुर्ला (प.) येथील ही जमीन आपल्या मालकीची आहे व त्या जमिनीभोवती आपण बांधलेली कुपणभिंत व उभारलेले तारेचे कुंपण ‘एमएमआरडीए’ने बेकायदा तोडून टाकले आहे, असा दावा त्याच भागातील अब्दुल अजीज लियाज मोहम्मद खान यांनी केला होता. नगर दिवाणी न्यायालयाने गेल्या वर्षी तो फेटाळल्यानंतर खान यांनी उच्च न्यायालयात अपील केले होते. न्या. रमेश धानुका यांनी ते फेटाळले. एवढेच नव्हेतर खान यांनी एमएमआरडीए, महापालिका व राज्य सरकार या तीन प्रतिवादींना दाव्याच्या खर्चापोटी प्रत्येकी 2क् हजार रुपये द्यावेत, असाही आदेश दिला गेला.
ही जमीन आपली आहे हे दाखविण्यासाठी खान यांनी 22 सप्टेंबर 1958 रोजी केलेले खरेदीखत व 2क्क्3मध्ये केलेले ‘कन्फर्मेशन डीड’ यांचा आधार घेतला होता. या जमीन खरेदीच्या वेळी खान जेमतेम 16 ते 18 वर्षाचे होते. रङझाक अली आणि करीमुल्ला सादिक हुसैन झकीर हुसैन या दोन भावांकडून आपण ही जमीन खरेदी केली, असा त्यांचा दावा होता. हे दोन्ही दस्तावेज आवश्यक ती स्टॅम्पडय़ुटी भरून रजिस्टर केलेले आहेत. शिवाय त्याच आधारे ही जमीन महसुली दफ्तरात आपल्या नावावर लागली आहे, असे त्यांचे म्हणणो होते.
याउलट एमएमआरडीएचे असे म्हणणो होते की, ही जमीन आमच्या मालकीची आहे. राज्य सरकारने जुलै 84मध्ये त्या भागातील एकूण 8.8537 हेक्टर जमीन आम्हाला दिली त्यातीलच ही जमीन आहे व तेव्हापासून ती आमच्या ताब्यात आहे. खान यांनी जमिनीवर मालकी सांगण्यासाठी जे खरेदीखत सादर केले ते तद्दन बनावट असल्याचे पुराव्यानिशी सिद्ध होत असल्याच्या दिवाणी न्यायालयाच्या निष्कर्षावर उच्च न्यायालयानेही शिक्कामोर्तब केले. शिवाय अशा बनावट दस्तावेजांची नोंदणी झाली किंवा त्याआधारे महसुली दफ्तरात नाव लागले एवढय़ाने जमिनीवरील खान यांची मालकी सिद्ध होत नाही. शिवाय या जमिनीभोवती त्यांनी कधी कुंपणभिंत बांधली होती व ती एमएमआरडीएने पाडली यालाही काही पुरावा नाही, असे न्यायालयाने म्हटले. (विशेष प्रतिनिधी)
 
खरेदीखतात जमिनीचा पत्ता देताना कुर्ला (प.) यासोबत 4क्क्क्7क् असा पिनकोड 
नंबरही दिलेला आहे. वस्तुत: टपाल बटवडय़ासाठी विविध शहरांना पिनकोड क्रमांक देण्याची पद्धत 1972पासून सुरू झाली, त्यामुळे 1958मध्ये कुल्र्याला पिनकोड 
असणो असंभव होते.
 
खरेदीखतात जमिनीचे मोजमाप चौ. मीटरमध्ये नमूद केले आहे. मीटर हे मेट्रिक परिमाण आहे. भारतात 1 ऑक्टोबर 1958 पासून मेट्रिक परिमाण लागू केले गेले. हे खरेदीखत त्याच्या आठवडाभर आधीचे आहे.