Join us

परीक्षा नियंत्रकपदी दीपक वसावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2015 02:14 IST

मुंबई विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक दिनेश भोंडे यांचा कार्यकाळ संपल्याने रिक्त झालेल्या पदावर दीपक वसावे यांची निवड करण्यात आली आहे.

मुंबई : मुंबई विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक दिनेश भोंडे यांचा कार्यकाळ संपल्याने रिक्त झालेल्या पदावर दीपक वसावे यांची निवड करण्यात आली आहे. विद्यापीठाच्या परीक्षा विभागात वरिष्ठ उपकुलसचिव म्हणून वसावे कार्यरत होते. त्यांच्याकडे स्थानापन्न परीक्षा नियंत्रक म्हणून कार्यभार सोपविण्यात आला आहे. भोंडे यांना त्यांच्या मूळपदी रुजू होण्यासाठी प्रशासनाने कार्यमुक्त केले. त्यामुळे कायमस्वरूपी परीक्षा नियंत्रकाची जागा रिक्त राहू नये, म्हणून वसावे यांना दुसऱ्यांदा ही जबाबदारी देण्यात आली आहे. तरी परीक्षा नियंत्रकाचे पद भरण्यासाठी लवकरच जाहिरात देणार असल्याचे विद्यापीठाने सांगितले.