Join us
Daily Top 2Weekly Top 5

लालूप्रसाद यादव पुन्हा ‘एशियन हार्ट’मध्ये दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2018 05:10 IST

राष्ट्रीय जनता दलाचे नेते लालूप्रसाद यादव यांना मंगळवारी सायंकाळी पुन्हा वांद्रे येथील एशियन हार्ट इन्स्टिट्यूटमध्ये दाखल करण्यात आले.

मुंबई : राष्ट्रीय जनता दलाचे नेते लालूप्रसाद यादव यांना मंगळवारी सायंकाळी पुन्हा वांद्रे येथील एशियन हार्ट इन्स्टिट्यूटमध्ये दाखल करण्यात आले. त्यांच्या छातीत दुखू लागल्याने त्यांना मंगळवारी साडे पाचच्या सुमारास दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर औषधोपचार सुरू आहेत.त्यांच्या शरीरातील हिमोग्लोबिनची पातळी कमी झाल्याचे रुग्णालय प्रशासनाने सांगितले. यापूर्वीही, २२ मेरोजी यादव यांना याच रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.सध्या रुग्णालयात त्यांच्यासोबत त्यांची मोठी मुलगी मिसा भारती आणि मोठा मुलगा तेजप्रतापही आहेत. त्यांना मूत्रपिंड आणि हृदयविकाराचा त्रास असल्याने त्यांची विशेष देखभाल घेण्यात येत असल्याचे रुग्णालय प्रशासनाने स्पष्ट केले.