Join us
Daily Top 2Weekly Top 5

ललित मोदींच्या वकिलाला जीवे मारण्याची धमकी

By admin | Updated: July 28, 2015 02:40 IST

इंडियन प्रिमियर लीग (आयपीएल) चे माजी वादग्रस्त अध्यक्ष व देशातून पलायन केलेल्या ललित मोदी यांचे वकील महमुद अबिदी यांना ठार मारण्याची धमकी देण्यात आलेली आहे.

मुंबई : इंडियन प्रिमियर लीग (आयपीएल) चे माजी वादग्रस्त अध्यक्ष व देशातून पलायन केलेल्या ललित मोदी यांचे वकील महमुद अबिदी यांना ठार मारण्याची धमकी देण्यात आलेली आहे. कुख्यात गुंड रवी पुजारी याने फोन करून आपल्याला धमकावल्याची तक्रार त्यांनी ओशिवरा पोलीस ठाण्यात दिली आहे.अबिदी हे अंधेरीच्या लोखंडवाला संकुलात राहतात. रविवारी दुपारी सव्वादोनच्या सुमारास त्यांच्या मोबाइलवर एक फोन आला. फोन करणाऱ्याने मी आॅस्ट्रेलियातून रवी पुजारी बोलत आहे़ तुम्ही ललित मोदीला का वाचवत आहात, असे विचारले. तेव्हा मी वकील म्हणून माझे कर्तव्य बजावत असल्याचे अबिदिनी त्याला सांगितले. त्यावर बंगळुरूमध्ये एका वकिलाला त्यांनी कसे ठार मारले, तसेच त्याचे वकीलपत्र न सोडल्यास तुम्हालादेखील नुकसान पोहोचविण्याची धमकी त्याने दिली. याप्रकरणी अबिदींनी आपल्याला व कुटुंबाला सुरक्षा पुरविण्यात यावी अशी मागणी केली आहे. दरम्यान, आम्हाला अ‍ॅड. अबिदी यांनी एक लेखी पत्र दिले असून, हे प्रकरण आम्ही क्राइम ब्रँचच्या खंडणीविरोधी पथकाकडे सोपविले आहे, अशी माहिती ओशिवरा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुभाष खानविलकर यांनी दिली. (प्रतिनिधी)