Join us

लालबाग-परळच्या पोरी हुश्शार!

By admin | Updated: October 4, 2016 03:03 IST

अमेरिकेतील जगविख्यात ‘पिस पर्ल’ या संस्थेच्या यंदाच्या बालचित्रकला स्पर्धेत लालबाग-परळमधील गुरुकूल स्कूल आॅफ आर्ट्सच्या दोन विद्यार्थिनींनी अंतिम दहामध्ये

मुंबई : अमेरिकेतील जगविख्यात ‘पिस पर्ल’ या संस्थेच्या यंदाच्या बालचित्रकला स्पर्धेत लालबाग-परळमधील गुरुकूल स्कूल आॅफ आर्ट्सच्या दोन विद्यार्थिनींनी अंतिम दहामध्ये स्थान मिळविले आहे. त्यापैकी अनघा हिर्लेकर बालमोहन विद्यामंदिर येथे दहावीत शिकत आहे तर सानिका वेंगुर्लेकर ही व्ही.एन.सुळे गुरुजी विद्यालयात आठवीला शिकत आहे. या दोघींनी अमेरिकेतील स्पर्धेत सुवर्णपदक व प्रशस्तिपत्रक मिळविले आहे.अनघाने जगभर शांततेचा संदेश देणाऱ्या दीपस्तंभावर महात्मा गांधी, मदर तेरेसा, अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांची चित्रे रेखाटली जात असल्याचे चित्र काढले आहे तर सानिकाने अमेरिकेच्या ओरलांडो क्लब येथे एका माथेफिरूने हल्ला केला, त्या घटनेवर आधारित ओरलांडो क्लबच्या दरवाजात मेणबत्ती लावून आदरांजली वाहिल्याचे चित्र साकारले आहे. या स्पर्धेतील यशामुळे दोन्ही विद्यार्थिनींचे लालबाग-परळमधील कलारसिकांनी, ज्येष्ठांनी आणि बालमित्रांनी कौतुक केले आहे. (प्रतिनिधी)