Join us
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात ३ जानेवारीपासून ‘लेक शिकवा’ अभियान

By admin | Updated: December 31, 2014 02:03 IST

शहरी, ग्रामीण आणि आदिवासी शाळांमधील मुलींच्या शिक्षणाला अधिकाधिक गती मिळावी आणि वंचित घटकातील मुलींना शिक्षणाच्या मूळ प्रवाहात आणले जावे,

मुंबई : शहरी, ग्रामीण आणि आदिवासी शाळांमधील मुलींच्या शिक्षणाला अधिकाधिक गती मिळावी आणि वंचित घटकातील मुलींना शिक्षणाच्या मूळ प्रवाहात आणले जावे, यासाठी प्राथमिक शिक्षण विभागामार्फत लेक शिकवा अभियान राबविण्यात येते. यंदा ३ ते २६ जानेवारीदरम्यान लेक शिकवा अभियान राज्यभरातील शाळांमध्ये राबविण्यात येणार असून, यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थाही सहभागी होणार आहेत.प्राथमिक शिक्षण संचालनालयामार्फत गत वर्षापासून सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून ‘लेक शिकवा अभियान’ राबविण्यात येत आहे. पहिल्याच वर्षी या अभियानाला प्राथमिक शाळांसोबतच इतर संस्थांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला होता. या अभियानाची दखल घेत केंद्रानेही देशभरात ‘बेटी पढाओ अभियान’ सुरू केले आहे. यंदा राज्यातील लेक शिकवा अभियान अधिक व्यापक करण्यासाठी प्राथमिक शिक्षण संचालनालयाने तयारी केली असून, ३ ते २६ जानेवारीदरम्यान गावखेड्यापर्यंतच्या प्रत्येक शाळेमध्ये हे अभियान राबवले जाणार आहे.