कल्याण - प्रवाशांच्या सुरक्षेच्या अनुषंगाने स्मार्ट कार्ड योजना लागू करण्याबरोबरच महिला वर्गासाठी विशेष रिक्षा चालविण्यात याव्यात या पोलिस उपायुक्त रश्मी करंदीकर यांनी केलेल्या सूचनेला ठाणो रिजन रिक्षा टॅक्सी महासंघाने हिरवा कंदील दाखविल्याने लवकरच कल्याण शहरात लेडिज स्पेशल रिक्षा धावताना दिसणार आहेत.
वाहतूक शाखेच्या पोलिस उपायुक्त पदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर करंदीकर यांनी बुधवारी सायंकाळी कल्याण शहराला भेट दिली. त्यावेळी रिक्षा टॅक्सी महासंघाचे अध्यक्ष प्रकाश पेणकर यांनी त्यांची भेट घेतली. यावेळी शहरातील वाहतुकीच्या समस्या व उपाययोजना याबाबत चर्चा करण्यात आली. ठाण्याप्रमाणोच कल्याण डोंबिवली शहरांमध्येही स्मार्ट कार्ड उपक्रम राबविण्याचा मनोदय करंदीकरांनी यावेळी व्यक्त केला. याला रिक्षा संघटनांकडून सर्वतोपरी सहकार्य मिळेल, असे आश्वासन पेणकर यांनी दिले. विशेष करून महिलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून शहरात महिला प्रवाशांसाठी रिक्षा चालविण्यात याव्यात, अशी सूचना करंदीकर यांनी केली असता त्यास मान्यता देऊन अशा रिक्षा सायंकाळी गर्दीच्या वेळेस रेल्वे स्थानक परिसर,खडकपाडा,आग्रारोड,बेतुरकरपाडा याठिकाणी ठेवून महिलांसाठी वेगळी रांग सुरू करण्याचे पेणकर यांनी तत्त्वत: मान्य केले. याबाबत रिक्षाचालकांची बैठक घेऊन सर्वेक्षण केल्यानंतर ही सुविधा सुरू करण्यास त्यांनी संमती दर्शविली. यावेळी त्यांनी शहरात बेकायदेशीर वाहतूक करणा:या 6 आसनी रिक्षाचालकांवर बंदी घालण्याची मागणी केली असता करंदीकर यांनी त्यासाठी विशेष मोहीम उघडण्यात येईल,असे सांगितले. (प्रतिनिधी)
बेकायदेशीर रिक्षा वाहतुकीला चाप
च्स्मार्ट कार्ड उपक्रमात रिक्षाचालकांशी संबंधित पूर्ण माहिती असण्याबरोबरच हे कार्ड परवानाधारक रिक्षाचालकालाच मिळणार असल्याने बेकायदेशीरपणो विनापरवाना रिक्षा चालविणा:यांना चाप बसेल, असा विश्वास पेणकर यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केला. या कार्डमुळे कोणत्या स्टँडवरची ही रिक्षा आहे याची माहितीही प्रवाशांना समजू शकेल, असे ते म्हणाले.