Join us
Daily Top 2Weekly Top 5

गाडी चोरून मागितली एक लाखाची खंडणी

By admin | Updated: January 8, 2016 02:24 IST

ड्रायव्हरने गाडी चोरून नेल्यानंतर गाडी परत देण्यासाठी खंडणी देण्यासाठी गुंडांकडून आलेल्या धमकीबाबत तक्रार करूनही कुर्ला पोलीस गुन्हा दाखल

मुंबई : ड्रायव्हरने गाडी चोरून नेल्यानंतर गाडी परत देण्यासाठी खंडणी देण्यासाठी गुंडांकडून आलेल्या धमकीबाबत तक्रार करूनही कुर्ला पोलीस गुन्हा दाखल करीत नसल्याबद्दल गाडीमालकाने पोलीस आयुक्तांना साकडे घातले आहे.कुर्ला येथील रहिवासी हुसैन अन्सारी यांची गाडी महिन्याभरापूर्वी चोरीला गेली होती. त्या गाडीवर ठेवलेले चालक पाचू आणि नैना यांनीच ती लपवून ठेवली होती. ती गाडी परत देण्याच्या बदल्यात पाइप रोड परिसरातील एका गुंडाने आपल्याला धमकावत एक लाख रुपये मागितल्याची तक्रार अन्सारी यांनी कुर्ला पोलीस ठाण्यात केली होती. मात्र पोलिसांनी गाडीचालक आणि गुंडांविरोधात एफआयआर दाखल केला नसल्याचे अन्सारी यांचे म्हणणे आहे. याबाबत पोलीस आयुक्त कार्यालयातून गुन्हा दाखल करण्याचे आदेश कुर्ला पोलिसांना दिले होते. मात्र जबाब नोंदवून घेण्याव्यतिरिक्त पोलिसांनी हालचाल केली नाही. नागरिकांच्या तक्रारींची दखल घेऊन गुन्हा दाखल करण्याचे निर्देश सरकारने दिले असतानाही पोलीस त्याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे अन्सारी यांनी सांगितले. (प्रतिनिधी)