Join us  

महापालिकेच्या खरेदीत पारदर्शकतेचा अभाव , विरोधी पक्षांकडून चौकशीची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 07, 2020 3:26 AM

बॉडी बॅगनंतर आता मास्कची खरेदीही दामदुप्पट किमतीत केल्याच्या आरोप होत आहे. त्यामुळे मध्यवर्ती खरेदी प्राधिकरणाच्या कारभारावर विरोधी पक्षांनी प्रश्न उपस्थिती करीत चौकशीची मागणी केली आहे.

मुंबई : कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी मुंबईतील अन्य व्यवहारांप्रमाणे महापालिका मुख्यालयात होणाऱ्या महत्त्वाच्या समित्या, महासभांच्या बैठकाही रद्द करण्यात आल्या. त्यामुळे विकासकामांसाठी तसेच आरोग्य खात्याअंतर्गत खरेदीचे अधिकार पालिका प्रशासनाला देण्यात आले आहेत. मात्र बॉडी बॅगनंतर आता मास्कची खरेदीही दामदुप्पट किमतीत केल्याच्या आरोप होत आहे. त्यामुळे मध्यवर्ती खरेदी प्राधिकरणाच्या कारभारावर विरोधी पक्षांनी प्रश्न उपस्थिती करीत चौकशीची मागणी केली आहे.पुरणाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी औषध व उपकरणाची खरेदी करताना वारेमाप पैसा मोजण्यात येत आहे. राज्याच्या आरोग्य विभागाने एन ९५ मास्क १७ रु पये ३३ पैशांमध्ये उपलब्ध असताना दोनशे रुपये मोजल्याचे ‘लोकमत’ने उघडकीस आणले. कोणत्याही खरेदीसाठी महापालिका प्रशासनाला स्थायी समिती आणि महासभेची मंजुरी घेणे अनिवार्य असते. मात्र कोविड १९ चा प्रसार टाळण्यासाठी सर्व बैठका रद्द करून पालिका आयुक्त, अतिरिक्त आयुक्त, उपायुक्त, विभाग अधिकारी यांना खर्चाचे अधिकार देण्यात आले आहेत.मात्र कोरोनाग्रस्त मृतदेहांना बंदिस्त करण्यासाठी बॉडी बॅग खरेदी करताना त्यात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप भाजपने केला होता. हे आरोप प्रशासनाने फेटाळून लावले तरी आता मास्क खरेदीतही मोठा घोटाळा असल्याचा आरोप विरोधी पक्षांनी केला आहे. पालिकेच्या मध्यवर्ती खरेदी प्राधिकरणामध्ये पारदर्शकतेचा अभाव असल्याची टीका विरोधी पक्षांनी केली आहे. तसेच या प्रकरणाची चौकशी करावी, अशी मागणी आता जोर धरत आहे.मध्यवर्ती खरेदी प्राधिकरणाच्या कामामध्ये पारदर्शकता अपेक्षित असते. मात्र त्याचा अभाव दिसून येत आहे. स्थायी समिती आणि महासभेची बैठकही होत नसल्याने प्रशासनाला कोणी जाब विचारणारे उरलेले नाही. त्यामुळेच असा मनमानी कारभार सुरू आहे.- रवी राजा,विरोधी पक्ष नेते, कोरोनाग्रस्त मृतदेहांना बंदिस्त करण्यासाठी बॉडी बॅग खरेदी करताना त्यात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप भाजपने केला होता. हे आरोप प्रशासनाने फेटाळून लावले तरी आता मास्क खरेदीतही मोठा घोटाळा असल्याचा आरोप विरोधी पक्षांनी केला आहे.मुंबई महापालिकाहाफकिन संस्थेने खरेदी केलेल्या मास्कपेक्षा दुप्पट किमतीत महापालिकेने मास्क खरेदी केले. यावर मे महिन्यातच आवाज उठवला होता. बॉडी बॅग खरेदीतील घोटाळा प्रकरणी दोन वेळा निदर्शने केली होती. तसेच मुख्यमंत्री आणि पालिका आयुक्तांना पत्र पाठवून चौकशीची मागणी केली आहे. मात्र अद्याप याबाबत कोणतेही ठोस आश्वासन मिळालेले नाही.- प्रभाकर शिंदे,गटनेते, भाजप 

टॅग्स :मुंबईमुंबई महानगरपालिका