मुंबई : देशातील भूकंपाच्या घटनांनंतर शासनासह जनतेमध्ये जागृती येईल, अशी अपेक्षा होती. मात्र, आजही भूकंपाप्रति जनता आणि शासनामध्ये प्राथमिक ज्ञानाचा अभाव आहे. जनतेमध्ये भौगोलिक ज्ञानासह तंत्रज्ञानाचाही अभाव असल्याची खंत प्राध्यापक शैलेश नायक यांनी व्यक्त केली.इंडियन सायन्स काँग्रेसमध्ये ‘डिझास्टर मॅनेजमेंट’ या विषयावरील चर्चासत्रात ते बोलत होते. दरड कोसळण्याच्या घटना मुसळधार पावसात मोठ्या प्रमाणावर होत असून, याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. यासाठी जनतेला प्रशिक्षण देऊन चालणार नाही. तर मदतकार्य तसेच तज्ज्ञांची योग्य सांगड घालण्याची गरज असल्याचे त्यांनी या वेळी नमूद केले.वादळाचा अंदाज घेणाऱ्या तंत्रज्ञानामुळे वादळांची पूर्वसूचना आपल्याला मिळाली आहे. त्यामुळे वादळांमुळे होणारी जीवितहानी टाळणे शक्य झाल्याचेही त्यांनी सांगितले. दरड कोसळण्यापूर्वी काही संकेत मिळत असतात. याकडे नागरिकांकडून दुर्लक्ष होत असल्याचे, पुणे विद्यापीठाच्या जिओलॉजीकल विभागाचे माजी प्रमुख एस.एस. ठिगळे यांनी सांगितले. दरड कोसळणे म्हणजे काय याबाबत शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना माहिती दिली पाहिजे, असेही ते म्हणाले.
नागरिकांमध्ये भौगोलिक ज्ञानाचा अभाव
By admin | Updated: January 7, 2015 02:06 IST