Join us  

केंद्र आणि राज्याच्या संघर्षात मजूर रस्त्यावर; ‘त्या’ दोन रात्री काय घडले?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2020 12:33 AM

डोके चक्रावून टाकणाऱ्या वेगवान घटनाक्रमाचा तपशील

- अतुल कुलकर्णी मुंबई : एखाद्या हिंदी सिनेमात, वेबसिरीजमध्ये घडावा असा, डोके चक्रावून टाकणारा घटनाक्रम २५ ते २७ मे च्या रात्रीत घडला आहे. २६ तारखेला पहाटे ३ च्या सुमारास ९२ रेल्वेचे वेळापत्रक अचानक पाठवले गेले.

विविध भागातील लोकांना एकत्र जमवून त्यांना स्टेशनवर आणण्यात किमान ८ ते १० तास लागत असताना या वेळापत्रकातील पहिल्या सात रेल्वे सकाळी १० ते साडेदहा मध्ये सुटतील असे सांगण्यात आले. त्यामुळे सुरुवातीच्याच रेल्वे वेळेवर जाऊ शकल्या नाहीत, परिणामी सगळ्याच रेल्वेचे सगळे वेळापत्रक कोलमडले. मिळालेल्या १४६ रेल्वेंपैकी ११२ रेल्वे मुंबईतील विविध स्टेशनवरुन सुटणाºया होत्या तर बाकीच्या ३४ रेल्वे पुणे, ठाणे, पनवेल, रायगड येथून सुटणाºया होत्या. मात्र या गोंधळामुळे २६ च्या रात्री १२ पर्यंत २५ आणि २७ च्या सकाळपर्यंत ३५ रेल्वे गेल्या. यासाठी २६ तारखेच्या पहाटेपासून कामाला लागलेले पोलिस अधिकारी, कॉन्स्टेबल २७ च्या रात्रीपर्यंत काम करत राहीले. एकही रेल्वे ठरलेल्या वेळेनुसार गेली नाही.

मजुरांच्या वाढत्या दबावामुळे ज्या राज्यात ट्रेन पाठवायची आहे त्यांच्या परवानगीची अट केंद्राने काढून टाकली. जे लोक पाठवले जातील त्यांची यादी त्या राज्याला द्या, असे सांगण्यात आले होते. त्यानुसार २४ तारखेपर्यंत सगळे व्यवस्थीत चालू होते. मात्र महाराष्टÑाला रोज ८० ट्रेन पाहिजेत, फक्त ३० ट्रेन दिल्या जात आहेत, असे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे म्हणाले आणि राजकारणाला सुरुवात झाली.

२५ तारखेला रात्री १२ वाजेपर्यंत सेंट्रल रेल्वेसाठी ३४ व वेस्टर्न रेल्वेसाठी २० अशा ५४ गाड्यांचे वेळापत्रक केंद्राने दिले होते. त्यानुसार अधिकाऱ्यांनी २६ तारखेच्या सकाळपासून लोकांना पाठवण्याचे नियोजन केले होते. पण २६ तारखेच्या पहाटे तीनच्या सुमारास ९२ नव्या गाड्यांचे वेळापत्रक आले. व्यवस्थेत असलेल्या पोलिस अधिकाºयांनी पहाटे आलेला मेसेज पाहिला. त्यामुळे सगळी यंत्रणा जागी झाली. डीसीपींना फोन केले गेले.

१०० गाड्या येत आहेत. त्या सकाळीच निघणार आहेत अशी बातमी मुंबईत वाºयासारखी पसरली. लोक बसची वाट न पहाता रेल्वे स्टेशनकडे निघाले. त्यामुळे लोकमान्य टिळक टर्मिनल्सवर जवळपास २५ हजार आणि सीएसटीवर २० हजाराचा जमाव जमला. बांद्रा, बोरीवलीतही स्टेशनवर लोक मोठ्या प्रमाणावर जमू लागले. त्यातच आधीच्या वेळापत्रकानुसार लोकांना घेऊन येणाºया बसेसची भर पडली आणि स्टेशनजवळील व्यवस्था कोलमडली. सोशल डिस्टन्सींगचे बारा वाजले. कोरोना राहिला दूर पण दगडफेक, चेंगराचेंगरी होते की काय, अशी भीती निर्माण झाली. पोलिसांनी परिस्थिती हाताळली म्हणून सुदैवाने काही घडले नाही.

एवढ्या मोठ्या संख्येने लोकांना राज्य सरकार पाठवू शकणार नाही, आम्ही तर रेल्वे दिल्या होत्या पण राज्यानेच त्या रद्द केल्या, असे चित्र काहींना त्यातून उभे होणार होते. मात्र २६ च्या पहाटेचा प्रकार पोलीस आयुक्त परमविरसिंग आणि मुख्य सचिव अजोय मेहता यांना सांगण्यात आला. त्यातील गांभीर्य व राजकारण दोन्ही वरिष्ठ अधिकाºयांनी ओळखले.

सगळा प्रकार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि परिवहन मंत्री अनिल परब यांना सांगण्यात आला. वाट्टेल ते झाले तरी कामाला लागा, एकही रेल्वे रिकामी जाऊ देऊ नका, अशा सूचना गेल्या. मुंबईचे सहआयुक्त विनय चौबे, अतिरीक्त पोलिस आयुक्त निशीत मिश्रा, संदीप कर्णिक, मंत्रालयातून अतिरिक्त मुख्य सचिव नितीन करीर, सचिव पराग जैन, अभय यावलकर, मुंबईतल्या विविध झोनचे डीसीपी, त्या त्या पोलिस ठाण्याचे पोलिस अधिकारी मैदानात उतरले.

राज्य सरकारनुसार नोटिफिकेशन

आम्हाला राज्य शासनाने टप्प्याटप्प्याने मागणी केली होती. आम्ही तसे नोटिफिकेशन काढत गेलो. आम्ही रात्रभर जागे होतो. जरी आम्ही रात्री ३ वाजता कळवले असले तरी सकाळी १० वाजता ट्रेन होती. अगदीच अर्ध्या तासाचे अंतर आम्ही ठेवलेले नव्हते. वेळ दिला होताच. राज्यांनीच केलेल्या मागणीनुसार पश्चिम बंगालसाठी आम्ही रेल्वे दिल्या होत्या. त्यातल्या काही त्या राज्यात गेल्या देखील. २६ तारखेला सकाळी १२ वाजेपर्यंत एकही ट्रेन गेली नाही, त्याचा लोड पुढे वाढत गेला. आमच्याकडे पुरेशी सोय होती.- शिवाजी सुतार, चीफ पीआरओ, सेंट्रल रेल्वे

टॅग्स :कोरोना वायरस बातम्या