Join us
Daily Top 2Weekly Top 5

कामगार नेते सुर्यकांत महाडिक यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2021 01:51 IST

मंगळवारी सकाळी ७ ते १० या वेळात त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी त्यांच्या चेंबूर येथील जुन्या घरी अमर निवास येथे ठेवण्यात येणार आहे. अंत्यसंस्कार त्यांच्या मुळगावी रत्नागिरी जिल्ह्यात खेड तालुक्यातील काडवली येथे करण्यात येणार आहेत.

मुंबई : भारतीय कामगार सेनेचे अध्यक्ष आणि शिवसेना उपनेते, माजी आमदार सुर्यकांत महाडिक यांचे सोमवारी रात्री अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्यावर खासगी रूग्णालयात उपचार सुरू होते. ते ७५ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात्त पत्नी, तीन मुले, एक मुलगी असा परिवार आहे.

मंगळवारी सकाळी ७ ते १० या वेळात त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी त्यांच्या चेंबूर येथील जुन्या घरी अमर निवास येथे ठेवण्यात येणार आहे. अंत्यसंस्कार त्यांच्या मुळगावी रत्नागिरी जिल्ह्यात खेड तालुक्यातील काडवली येथे करण्यात येणार आहेत. आपल्या मुळगावीच अंत्यसंस्कार व्हावेत, अशी इच्छा त्यांनी आपल्या सहकाऱ्यांकडे मागील काळात व्यक्त केली होती. त्यानुसार मुळगावी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.  सूर्यकांत महाडीक यांनी दोनवेळा कुर्ला विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले होते. मात्र, हिंदुत्वाच्या मुद्दयावर सर्वोच्च न्यायालयात त्यांची आमदारकी रद्द झाली होती. २००३ सालापासून महाडिक यांच्याकडे अखिल भारतीय कामगार सेनेचे अध्यक्ष पद होते. अखेरच्या क्षणापर्यंत ते अध्यक्षपदी कार्यरत होते. लढवैय्या कामगार नेता अशी त्यांची ख्याती होती. महाडिक यांच्या निधनाने भारतीय कामगार सेनेचा दीपस्तंभ हरपल्याची भावना भारतीय कामगार सेनेतूून व्यक्त करण्यात येत आहे.

टॅग्स :शिवसेना