मुंबई : लोकलमधून प्रवास करताना किंवा स्थानकात गर्दीतून वाट काढताना अनेकांचे मोबाइल हे चोरांकडून लंपास केले जातात. याची तक्रार रेल्वे पोलिसांकडे (जीआरपी) केल्यानंतर काही तक्रारींचा छडा लावला जातो, तर काही प्रवाशांना प्रतीक्षा करावी लागते. एकूणच मोबाइल चोरीमुळे प्रवाशांना मोठ्या मनस्तापाला सामोरे जावे लागत असून, गेल्या आठ महिन्यांत उपनगरीय मार्गावर १ हजार ४९२ मोबाइल चोऱ्या झाल्या आहेत. यात कुर्ला, ठाणे यांचा अग्रक्रमांक लागतो. रेल्वे स्थानक आणि हद्दीत मोबाइल चोरांचा मोठ्या प्रमाणात सुळसुळाट झाला असून, त्यांना आळा घालण्यास रेल्वे पोलीसही (जीआरपी) कमी पडत आहेत. लोकलमधून प्रवास करताना किंवा स्थानकात वाट काढताना गर्दीचा फायदा घेत चोरांकडून मोबाइल लंपास केले जातात. एखादा प्रवासी दुसऱ्या प्रवाशाशी बोलण्यात गुंतलेला असताना किंवा लोकलमध्ये गर्दीतून चढताना प्रवाशांच्या खिशावरच डल्ला मारून मोबाइल चोरले जात असल्याचे रेल्वे पोलीस सांगतात. यात महत्त्वाची बाब म्हणजे काही चोर हे टोळके घेऊन वावरतात. टोळक्यातील एक जण प्रवाशाला बोलण्यात गुंतवतो आणि दुसऱ्याकडून त्या प्रवाशाचा मोबाइल लंपास केला जातो. या पद्धतीने चोरी करताना प्रवाशाला कोणत्याही प्रकारचा संशय येत नाही. त्यामुळे ही पद्धत चोरांकडून जास्तीत जास्त अवलंबली जात असल्याचे रेल्वे पोलिसांनी सांगितले. त्यामुळे अनोळखी व्यक्तीकडे बोलताना प्रवाशांनी सावध राहिले पाहिजे, असे आवाहनही वारंवार रेल्वे पोलीस करतात. गेल्या काही वर्षांत उपनगरीय मार्गावर मोठ्या प्रमाणात मोबाइल चोऱ्या होत आहेत. मात्र त्याचा छडा लावताना रेल्वे पोलिसांच्याही नाकी नऊ येत असल्याचे दिसते. २0१३मध्ये १ हजार ४५ मोबाइल चोरीच्या घटना घडल्या आहेत आणि यातील ७१0 चोऱ्यांचा उलगडा झाला. २0१४ मध्ये तर मोबाइल चोरीच्या घटनांत वाढ झाली असून, १ हजार ५१८ मोबाइल चोरीला गेले. त्यातील फक्त ८६३ मोबाइल चोऱ्यांचा छडा लावण्यात आला. २0१५ मधील आठ महिन्यांत तर मोबाइल चोरीची आकडेवारी ही जास्त असल्याचे दिसते. आठ महिन्यांत १ हजार ४९२ मोबाइल चोरीला गेले आहेत. फक्त ७७८ चोऱ्यांचा छडा लावण्यात यश आले असून, कुर्ला व ठाणे स्थानकात सर्वाधिक चोऱ्या झाल्या आहेत. रेल्वे पोलिसांच्या सीएसटी विभागात येणाऱ्या कुर्ला पोलीस ठाणे अंतर्गत २६३ मोबाइल चोऱ्या झाल्या आहेत. कल्याण विभागात असणाऱ्या ठाणे पोलीस स्थानकांतर्गत तर २६0 चोऱ्या झाल्याची माहिती रेल्वे पोलीस अधिकाऱ्यांकडून देण्यात आली. यानंतर वडाळा, दादर, वांद्रे, बोरीवली स्थानकांचा नंबर लागतो. (प्रतिनिधी)जानेवारी ते आॅगस्ट महिन्यातील चोऱ्यापोलीस स्टेशनचोऱ्यासापडलेसीएसटी५५२९दादर११५४९कुर्ला२६३१४४सीएसटी विभाग४३३२२२ठाणे२६0११२डोंबिवली३0१८कल्याण६२३१कर्जत१४११कल्याण विभाग३६६१७२वडाळा१८१७८वाशी५0२२पनवेल१८६हार्बर विभाग२४९१0६चर्चगेट३३१२मुंबई सेंट्रल४२३0अंधेरी९६४८वांद्रा विभाग२७८१८१बोरीवली८७३८वसई७२५४पालघर७५वसई विभाग१६६९७एकूण१,४९२७७८
मोबाइल चोरीत कुर्ला आघाडीवर
By admin | Updated: October 6, 2015 00:56 IST