Join us
Daily Top 2Weekly Top 5

कुर्ल्यात एलबीएस मार्गावरील कोंडी फुटेना!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2018 02:06 IST

कुर्ला पश्चिम आणि अंधेरी पूर्वेला जोडणाऱ्या काळे मार्गावरील कमानीकडून बैलबाजार दिशेकडे वाहणारी वाहतूक विकासकामाच्या नावाखाली कित्येक महिन्यांपासून बंद करण्यात आली.

मुंंबई : कुर्ला पश्चिम आणि अंधेरी पूर्वेला जोडणाऱ्या काळे मार्गावरील कमानीकडून बैलबाजार दिशेकडे वाहणारी वाहतूक विकासकामाच्या नावाखाली कित्येक महिन्यांपासून बंद करण्यात आली. परिणामी, या रस्त्यावरून जाणाºया वाहनांना एलबीएस मार्गावरील फौजिया रुग्णालयाजवळ वळण घेऊन बैलबाजारमार्गे साकीनाका गाठावे लागत आहे. वळणामुळे एलबीएसवर ऐन ‘पीक अवर’ला कोंडी होत असून, ती टाळण्यासाठी घाटकोपरहून बैलबाजारमार्गे साकीनाक्याकडे जाणाºया किमान छोट्या वाहनांसाठी कमानी ते बैलबाजार ही एक दिशा खुली करण्यात यावी, अशी मागणी स्थानिकांंकडून होत आहे.महत्त्वाचे म्हणजे ज्या कामासाठी हा मार्ग बंद करण्यात आला; ते काम आता पूर्ण झाले आहे. तरीही महापालिका आणि वाहतूक विभाग येथील वाहतूक पूर्ववत करण्याबाबत ठोस पावले उचलत नसल्याचे स्थानिक राकेश पाटील यांचे म्हणणे आहे. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, ही वाहतूक सुरू केली तर एलबीएस, बैलबाजार, साकीनाका, जरीमरी आणि घाटकोपर येथील वाहतूक सुरळीत होण्यास मदत होईल.