Join us

पीआरसीआयच्या अध्यक्षपदी कुमार

By admin | Updated: March 23, 2015 02:03 IST

पब्लिक रिलेशन्स कौन्सिल आॅफ इंडिया या जनसंपर्क, जाहिरात, मनुष्यबळ आणि माध्यम व्यावसायिकांच्या सर्वोच्च संस्थेच्या अध्यक्षपदी कन्सेप्ट पीआरचे कार्यकारी संचालक बी. एन. कुमार यांची निवड झाली आहे.

मुंबई : पब्लिक रिलेशन्स कौन्सिल आॅफ इंडिया या जनसंपर्क, जाहिरात, मनुष्यबळ आणि माध्यम व्यावसायिकांच्या सर्वोच्च संस्थेच्या अध्यक्षपदी कन्सेप्ट पीआरचे कार्यकारी संचालक बी. एन. कुमार यांची निवड झाली आहे. २५ संस्थांसह संपूर्ण देशभरामध्ये कार्यरत असणाऱ्या पीआरसीआयच्या नवी दिल्ली येथे झालेल्या राष्ट्रीय कार्यकारिणीने बी. एन. कुमार यांची निवड करण्याचा निर्णय घेतला. यापुर्वी कुमार यांनी पीआरसीआयच्या मुंबई विभागाची जबाबदारी तसेच राष्ट्रीय उपाध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळली आहे. पीआरसीआयने विजय लक्ष्मी यांची संस्थेच्या गव्हर्निंग कौन्सिलच्या संचालकपदी, तर राष्ट्रीय कार्यकारिणीच्या सरचिटणीसपदी भारती सिंह यांची निवड केली आहे. (प्रतिनिधी)