Join us
Daily Top 2Weekly Top 5

कृष्णा हेगडे मुंबई भाजपाचे उपाध्यक्ष

By admin | Updated: February 4, 2017 04:24 IST

माजी आमदार कृष्णा हेगडे यांची मुंबई भाजपाच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. हेगडे यांनी अलिकडेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष खा.रावसाहेब

मुंबई : माजी आमदार कृष्णा हेगडे यांची मुंबई भाजपाच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. हेगडे यांनी अलिकडेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष खा.रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला होता. ते विलेपार्ले मतदारसंघाचे माजी आमदार आहेत. काँग्रेसमधून त्यांनी आपल्या राजकीय कारकीर्दीला सुरुवात केली होती. दिवंगत काँग्रेस नेते आणि अभिनेते सुनिल दत्त यांचे निकटवर्तीय म्हणून ते ओळखले जात. सात वर्षे पाकिस्तानी तुरुंगात खितपत पडलेल्या भावेश परमार या मुंबईकर युवकाच्या सुटकेत त्यांनी महत्वाची भूमिका बजावली होती. (प्रतिनिधी)