Join us

कुरारमध्ये महिलेची दगडाने ठेचून हत्या

By admin | Updated: May 7, 2016 00:58 IST

मालाडच्या कुरार परिसरात एका महिलेचा विवस्त्र अवस्थेतील मृतदेह शुक्रवारी सापडला. या महिलेची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली आहे. तिच्यावर बलात्कार झाल्याचा संशय आहे.

मुंबई : मालाडच्या कुरार परिसरात एका महिलेचा विवस्त्र अवस्थेतील मृतदेह शुक्रवारी सापडला. या महिलेची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली आहे. तिच्यावर बलात्कार झाल्याचा संशय आहे. याप्रकरणी कुरार पोलिसांनी अनोळखी व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.शुक्रवारी सकाळी दहाच्या सुमारास कुरार परिसरात असलेल्या पिंपरीपाडा येथील पाण्याच्या टाकीजवळ एक मृतदेह असल्याचा फोन पोलीस नियंत्रण कक्षाला आला. त्यानुसार कुरार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि मृतदेह ताब्यात घेत तो शवविच्छेदनासाठी शताब्दी रुग्णालयात पाठविला. याप्रकरणी अनोळखी व्यक्तीविरोधात खुनाचा गुन्हा नोंदवल्याचे परिमंडळ बाराचे पोलीस उपायुक्त रामकुमार यांनी सांगितले. या महिलेवर बलात्कार झाला आहे का, हे शवविच्छेदन अहवालानंतरच स्पष्ट होईल, असे कुरार पोलिसांचे म्हणणे आहे. (प्रतिनिधी)