Join us
Daily Top 2Weekly Top 5

कोपरखैरणेत राष्ट्रवादीला खिंडार

By admin | Updated: March 23, 2015 00:40 IST

कोपरखैरणे राष्ट्रवादी तालुका सरचिटणीस गोपीनाथ आगास्कर यांनी रविवारी शिवसेनेत प्रवेश केला. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते भगवा हाती घेऊन त्यांनी पक्षांतर केले.

नवी मुंबई : कोपरखैरणे राष्ट्रवादी तालुका सरचिटणीस गोपीनाथ आगास्कर यांनी रविवारी शिवसेनेत प्रवेश केला. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते भगवा हाती घेऊन त्यांनी पक्षांतर केले.पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेकांचा पक्षांतरावर जोर सुरु आहे. त्याचा सर्वाधिक फटका राष्ट्रवादीला बसला असून आजतागायत अनेक नगरसेवक व पदाधिकाऱ्यांनी सेनेची वाट धरली. सेनेचे हे इनकमिंग सुरूच असून रविवारी कोपरखैरणेचे तालुका सरचिटणीस गोपीनाथ आगास्कार यांनी समर्थकांसह शिवसेनेत प्रवेश केला.आगास्कर हे पाच वर्षांपूर्वी सेनेतूनच राष्ट्रवादीमध्ये आले होते. त्यानंतर ऐन पालिका निवडणूकीपूर्वी त्यांनी पुन्हा सेनेत उडी घेतली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीला कोपरखैरणे विभागात झटका बसला. (प्रतिनिधी)