Join us  

कोकणला मुसळधारेचा इशारा कायम

By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2019 1:47 AM

कोकण, गोवा, मराठवाडा, विदर्भ, मध्य महाराष्ट्रात १९ जुलै रोजी आणि २० व २१ जुलै रोजी कोकण, गोवा, मराठवाडा, विदर्भ, मध्य महाराष्ट्रात पाऊस पडेल, असा अंदाज भारतीय हवामान शास्त्र विभागाने वर्तविला आहे,

मुंबई : कोकण, गोवा, विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात १८ जुलै रोजी, कोकण, गोवा, मराठवाडा, विदर्भ, मध्य महाराष्ट्रात १९ जुलै रोजी आणि २० व २१ जुलै रोजी कोकण, गोवा, मराठवाडा, विदर्भ, मध्य महाराष्ट्रात पाऊस पडेल, असा अंदाज भारतीय हवामान शास्त्र विभागाने वर्तविला आहे, तसेच पुढील २४ तासांत कोकणात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल, असा इशाराही दिला आहे. मुंबईचा विचार केल्यास मुंबई शहर आणि उपनगरात गुरुवासह शुक्रवारी आकाश सामान्यत: ढगाळ राहील. हलक्या स्वरूपाचा पाऊस पडेल, अशी शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. हवामान शास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी मान्सून पंजाब, हरियाणाच्या उर्वरित भागांत दाखल झाला आहे.