संतोष मिठारी - कोल्हापूर -भाजप, सेना, राष्ट्रवादीचे कोल्हापूर जिल्ह्यातील नवनियुक्त आमदारांपैकी सात जणांनी पदवी, तर इचलकरंजीतील आमदार सुरेश हाळवणकर, गारगोटीचे आमदार प्रकाश आबिटकर यांनी पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. ‘चंदगड’च्या आमदार संध्यादेवी कुपेकर या बारावी उत्तीर्ण आहेत. सहा आमदारांचा व्यवसाय हा शेती असून, उर्वरित वैद्यकीय, वाहतूक, सराफ, यंत्रमाग उद्योगक्षेत्रात कार्यरत आहेत.जिल्ह्यातील एकत्रित ९ लाख १९ हजार ८२४ मतदारांनी १२१ उमेदवारांपैकी दहाजणांवर विश्वास दाखवत त्यांना राज्याच्या विधानसभेत आपले नेतृत्व करण्याची संधी दिली. अशा उमेदवारांचे वय, शिक्षण आणि त्यांचा राजकारणाशिवाय असलेल्या व्यवसायाचा ‘लोकमत’ने आढावा घेतला. निवडणुकीच्या रिंगणात मतांची आघाडी घेत आमदार म्हणून निवडून आलेले जिल्ह्यातील दहा आमदार हे साक्षर आहेत. त्यातील ‘कोल्हापूर दक्षिण’चे आमदार अमल महाडिक हे बी. एस्सी. (मॅथ्स्) पदवीधर असून, त्यांनी विधानसभेच्या निवडणुकीत पहिल्याच प्रयत्नात बाजी मारली आहे. ते जिल्ह्यातील सर्वांत तरुण आमदार आहेत. ‘चंदगड’च्या संध्यादेवी कुपेकर या ज्येष्ठ आमदार असून, त्यांचे बारावीपर्यंत शिक्षण झाले आहे. वाणिज्य शाखेतून पदवीधर असलेले राजेश क्षीरसागर हे एकमेव आमदार आहेत. अभियांत्रिकी विद्या शाखेतून आमदार चंद्रदीप नरके यांनी पदवी घेतली आहे. संध्यादेवी, हसन मुश्रीफ आणि हाळवणकर वगळता उर्वरित सात आमदार हे पन्नाशीच्या आतील आहेत. उच्चशिक्षित असलेले हे आमदार आपआपल्या ज्ञानाचा मतदारसंघांच्या विकासासाठी खुबीने वापर करतील ही अपेक्षा आहे.आमदारवयशिक्षणव्यवसायअमल महाडिक ३६ बी. एस्सी. (मॅथ्स्)ट्रान्सपोर्टराजेश क्षीरसागर ४५बी. कॉम.सराफचंद्रदीप नरके४७बी. ई. सिव्हीलशेतीसत्यजित पाटील४०बी. एस्सी. (अॅग्री)शेतीहसन मुश्रीफ६१बी. ए.शेतीप्रकाश आबिटकर४०एम. ए.शेती सुरेश हाळवणकर५१एम.ए., बी.एड्.यंत्रमाग उद्योगउल्हास पाटील४७बी. ए.शेतीसंध्यादेवी कुपेकर६४बारावीशेतीडॉ. सुजित मिणचेकर४३बी.डी.एस डेंटिस्टप्राध्यापकांचा ‘परफॉर्मन्स’तीन प्राध्यापकांनी विधानसभेची निवडणूक लढविली. उच्चशिक्षित असून देखील त्यांना मतदारांनी नाकारले. यात राधानगरीतून स्वाभिमानी पक्षाचे प्रा. जालंदर पाटील यांना ५ हजार ९४२ आणि कोल्हापूर उत्तरमधील बहुजन समाज पार्टीचे प्रा. डी. श्रीकांत यांना १ हजार १२०, तर महाराष्ट्र विकास आघाडीचे उमेदवार आणि महाराष्ट्र राज्य तत्वज्ञान परिषदेचे अध्यक्ष राहिलेल्या प्रा. डॉ. ज. रा. दाभोळे यांना अवघी ७८ मते मिळाली. डॉ. दाभोळे हे त्यांच्या विरोधातील उमेदवारांपेक्षा वयस्कर असून देखील त्यांनी नेटाने प्रचार केला. आमदारकीची वर्षेहसन मुश्रीफ हे चौथ्यांदा आमदार झाले आहेत. संध्यादेवी कुपेकर, सुरेश हाळवणकर, राजेश क्षीरसागर, सुजित मिणचेकर आणि चंद्रदीप नरके यांना सलग दुसऱ्यांदा, तर सत्यजित पाटील यांना दहा वर्षांच्या ‘गॅप’नंतर पुन्हा संधी मिळाली आहे.
कोल्हापूर जिल्ह्याचे आमदार ‘पदवीधर’
By admin | Updated: October 21, 2014 00:18 IST