Join us
Daily Top 2Weekly Top 5

कोची युद्धनौका जानेवारीमध्ये नौदलात?

By admin | Updated: September 18, 2014 02:31 IST

शत्रूंच्या जहाजांचा वेध घेणारी शस्त्रसज्ज अशी आयएनएस कोलकाता युद्धनौका ऑगस्ट महिन्यात नौदलाच्या ताफ्यात दाखल झाली.

मुंबई : शत्रूंच्या जहाजांचा वेध घेणारी शस्त्रसज्ज अशी आयएनएस कोलकाता युद्धनौका ऑगस्ट महिन्यात नौदलाच्या ताफ्यात दाखल झाली. यानंतर याच श्रेणीतील कोची युध्दनौका 2015च्या जानेवारी महिन्यात दाखल होणार असल्याचे नौदलातील एका वरिष्ठ अधिका:याकडून सांगण्यात आले. 
नौदलाच्या ताफ्यात सध्या 2क्3 विविध प्रकारच्या युद्धनौका आणि पाणबुडय़ा आहेत. यामध्ये पारंपरिक युद्धनौका, पाणबुडय़ा, आण्विक, भूजलचर, विमानवाहू जहाज, युद्धनौकांना पेट्रोल पोहोचवणारी इत्यादींचा समावेश आहे. नौदल अशा विविध युद्धनौका आणि पाणबुडय़ांनी सज्ज झालेले असतानाच येत्या काळात आणखी सहा युद्धनौका आणि सहा पाणबुडय़ांनी अधिक सुसज्ज होणार आहे. माझगाव डॉकमध्ये सहा युद्धनौका आणि सहा पाणबुडय़ांची बांधणी केली जात आहे. यात ब्राव्हो प्रकारातील चार युद्धनौकांची बांधणी केली जाणार असून, यातील एक युद्धनौका दोन वर्षात नौदलाच्या ताफ्यात येईल, तर कोलकाता प्रकारातील तीनपैकी एक असलेली कोलकाता युध्दनौका ऑगस्ट महिन्यात दाखल झाली. याच प्रकारातील कोची आणि चैन्नई या युध्दनौकांचीही बांधणी केली जात आहे. यातील कोची युध्दनौका जानेवारी 2015 मध्ये दाखल होईल, असे नौदलातील सूत्रंनी सांगितले. (प्रतिनिधी)
 
आयएनएस युध्दनौकेप्रमाणोच कोची युध्दनौकेचीही तीच वैशिष्टय़े असणार आहेत. यात ब्राम्होस क्षेपणास्त्र, हेलिकॉप्टरची सोय, बाराक क्षेपणास्त्र, 76 प्रकारांतील एमएम गन अशी काही वैशिष्टय़े असतील, असे सूत्रंनी सांगितले.