Join us

Gudi Padwa 2018 : जाणून घ्या पाडव्याच्या कडू ‘नैवेद्या’मागचे गुपित; वर्षानुवर्षांच्या परंपरेमागे सुदृढ आरोग्य हाच विचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2018 06:19 IST

आज गुढीपाडवा. भारतीयांचे हे नववर्ष. मुंबापुरीमध्ये आज पाडवा आणि नववर्षानिमित्ताने भव्य शोभायात्रा, ढोल-ताशा पथकांचानाद चौफेर घुमणार आहे. मराठी भाषिक आपल्या घरातही गुढी उभारून पाडवा अनोख्या पद्धतीने साजरा करतात.

मुंबई : आज गुढीपाडवा. भारतीयांचे हे नववर्ष. मुंबापुरीमध्ये आज पाडवा आणि नववर्षानिमित्ताने भव्य शोभायात्रा, ढोल-ताशा पथकांचानाद चौफेर घुमणार आहे. मराठी भाषिक आपल्या घरातही गुढी उभारून पाडवा अनोख्या पद्धतीने साजरा करतात. या दिवशी गुढीचा नैवेद्य म्हणून कडुनिंबाची कोवळीपाने, गूळ, साखर, मिरे, जिरे, ओवा, हिंग, मीठ यांचे मिश्रण वाटून एकजीव करून प्रत्येकाला थोडा थोडा प्रसाद खायला देतात. तो यासाठी की वर्षाची, दिवसाची किंवा आयुष्याची सुरुवात जरी कडू झाली, तरी शेवट गोड व्हावा हा संदेश यातून मिळतो. तसेच, आयुष्यात येणाऱ्या कटू अनुभवाचा घोटही आपल्याला रिचवता यायला हवा, हे या प्रसादाचे मर्म आहे.वसंतातल्या या चैत्र शुद्ध प्रतिपदेला नववर्ष साग्रसंगीतपणे साजरे करतात. दाराला झेंडूचे तोरण बांधून, आंब्याच्या डहाळा लावून, दारात रांगोळी रेखाटून वातावरण प्रसन्न होते. नवीन वस्त्र परिधान करून पारंपरिक पद्धतीने गुढी उभारून मनोभावे नमस्कार केला जातो. प्रसाद म्हणून गूळ हा चवीने खाल्ला जातो. गोड आणि गुणाने उष्ण असल्याने शरीरातील दुष्ट कफाचा नाश करून शरीरस्थ जठराग्नी सुस्थितीत राखायला तो मदत करतो. विलयन पावलेल्या दुष्ट कफामुळे शरीरात अनेक प्रकारच्या कृमींची उत्पत्ती होते. या स्थितीत कृमीनाशक, कफदोषशामक, रक्तशोधन करणाºया गुणांचा कडुनिंब वापरण्याचा शास्त्रादेश असल्याने शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी याचा उपयोग होतो, असेहीडॉ. लोखंडे यांनी सांगितले. तर धणे हे पित्तशामक, दाहशामक, शरीराला थंडावा देणारे आहे. एकंदरीतचहा संयोग नुसताच पाडव्यादिनी नघेता काही दिवस सेवन केला तरवसंत ऋतूत कफदोष होत नाही. शिवाय, ग्रीष्म ऋतूत पित्तदोषाच्या संचयाने होणाºया रोगांची उत्पत्तीसहज टाळता येऊ शकते. दूरदृष्टीठेवून केलेला हा रोगप्रतिबंधकविचार हा आयुर्वेदाने मानवालास्वास्थ्य रक्षणासाठी दिलेले वरदानच आहे, असे डॉ. लोखंडे यांनीअधोरेखित केले.मंदाग्नी हे साºया रोगांचे मूळहेमंत-शिशिर महिन्यातील थंड वातावरणात शरीरात गोठलेला कफ, हा उत्तरायणातल्या सूर्याच्या प्रखर किरणांच्या तेजामुळे वितळून शरीरात कफदोष प्रकोपित होतो. ज्यामुळे या काळात कफदोषापासून जन्माला येणारे रोग सहज डोके वर काढू पाहतात. कफदोषाच्या विलयनाने जठराग्नी (शरीराची पाचनशक्ती) मंद होते आणि मंदाग्नी हेच साºया रोगांचे मूळ कारण, असे आयुर्वेद शास्त्र सांगते, अशी माहिती डॉ. तेजस लोखंडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.

टॅग्स :गुढीपाडवा २०१८