Join us
Daily Top 2Weekly Top 5

घातक हत्यारांसह अटक केलेला इसम चाकू विक्रेता

By admin | Updated: October 3, 2014 22:56 IST

घातक हत्यारांसह अटक केलेला इसम चाकू विक्रेता

घातक हत्यारांसह अटक केलेला इसम चाकू विक्रेता
मंुबई: नाकाबंदी दरम्यान गुरुवारी चुनाभ˜ी पोलिसांनी एका इसमाला दीड हजार घातक हत्यारांसह ताब्यात घेतले होते. चौकशी दरम्यान हा आरोपी एक चाकू विक्रेता असल्याचे उघड झाले आहे. मात्र आरोपीने हत्यार बंदी कायद्याचे उल्लंघन केल्याने या आरोपीवर गुन्हा दाखल करत चुनाभ˜ी पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
निवडणुकीदरम्यान काही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी मुंबईत पोलिसांनाकडून चोख बंदोबस्त लावण्यात आला आहे. शिवाय सर्व मुख्य रस्त्यांवर नाकाबंदी देखील लावण्यात आली आहे. गुरुवारी चुनाभ˜ी पोलिसांकडून प्रियदर्शनी येथे नाकाबंदी लावण्यात आली होती. याच दरम्यान एका टॅक्सीतून एक इसम संशयास्पदरितीने जात असताना पोलिसांना आढळून आला. पोलिसांनी टॅक्सी बाजूला घेऊन तपासणी केली असता, त्यामध्ये ११० चॉपर आणि दीड हजार चाकू असा हत्यारांचा मोठा साठा आढळून आला. त्यानुसार पोलिसांनी टॅक्सीसह टॅक्सीतून प्रवास करणारा अब्दुल सय्यद (३२) याला ताब्यात घेतले.
पोलिसांनी त्याच्याकडे चौकशी केली असता आपला चाकू विक्रीचा व्यवसाय असल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. बकरी ईद निमित्त चाकूंची मोठ्या प्रमाणात मागणी असल्याने काही दुकानदारांच्या ऑर्डर प्रमाणे माल घेऊन जात असल्याचे त्याने सांगितले. त्यानुसार पोलिसांनी भेंडी बाजार परिसरातील दुकानदारांकडे चौकशी केली असता, त्यांनी चाकूंची ऑर्डर दिल्याचे पोलिसांना सांगितले. मात्र निवडणुका असताना इतक्या मोठ्या प्रमाणात धारदार हत्यार घेऊन प्रवास केल्याने पोलिसांनी त्याच्यावर हत्यार बंदी कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे. (प्रतिनिधी)