Join us  

Kisan Long March : मोर्चेक-यांसाठी रेल्वे, एसटी सज्ज, परतीचा प्रवास सुखकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2018 5:10 AM

हजारोंच्या संख्येने दाखल झालेल्या शेतकरी मोर्चेक-यांच्या परतीच्या प्रवासासाठी रेल्वे प्रशासन आणि एसटी महामंडळ सज्ज झाले. रेल्वेने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सोमवारी दोन विशेष ट्रेनची व्यवस्था केली होती, तर एसटी महामंडळाने आझाद मैदान येथून १५ एसटी बसची सोय केली होती.

मुंबई : हजारोंच्या संख्येने दाखल झालेल्या शेतकरी मोर्चेक-यांच्या परतीच्या प्रवासासाठी रेल्वे प्रशासन आणि एसटी महामंडळ सज्ज झाले. रेल्वेने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सोमवारी दोन विशेष ट्रेनची व्यवस्था केली होती, तर एसटी महामंडळाने आझाद मैदान येथून १५ एसटी बसची सोय केली होती.नाशिक ते मुंबई (आझाद मैदान) असा प्रवासी टप्पा चालत मोर्चेकºयांनी पार केला. ८० टक्के मागण्या मान्य झाल्यानंतर, आता त्यांचा परतीचा प्रवास सुखकर होण्यासाठी रेल्वे प्रशासनाने सीएसएमटी ते भुसावळ मार्गावर सोमवारी रात्री ८ वाजून ५० मिनिटांनी आणि रात्री १० वाजता विशेष एक्स्प्रेसची सोय केली. त्याचबरोबर, सीएसएमटी-मनमाड पंचवटी एक्स्प्रेस, हावडा मेल व्हाया अलाहाबाद आणि दादर-शिर्डी एक्स्प्रेसला प्रत्येकी एक अनारक्षित अतिरिक्त बोगी जोडण्याचा निर्णय घेतल्याचे, मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुनील उदासी यांनी सांगितले.एसटी महामंडळाने आझाद मैदानाजवळ सोमवारी १५ एसटी बसेसची सोय केली. तर कसारा रेल्वे स्टेशनजवळही एसटीने जादा १५ बसेसची व्यवस्था केली होती, असे एसटी महामंडळाने स्पष्ट केले.>उन्हातान्हात रणरागिणी लढल्यामुंबई : शेतकरी मोर्चात महिलांचे प्रमाण लक्षणीय होते. पाय सोलले, सुजले, भेगा पडल्या, रक्त सांडले, चपला तुटल्या.. काहींनी तर अनवाणीच प्रवास केला. मोर्चात सहभागी झालेल्या ७० वर्षीय लक्ष्मीबाई गारदे म्हणाल्या, ‘आता अर्धी लाकडे मसणात गेलीत, पण तरीही जमिनीवरचे प्रेम कमी झालेले नाही. याच जमिनीने आयुष्यभर आमचे पोट भरले, तिच्यासाठी इथवर आलोय,’ दिंडोरीहून आलेल्या ४५ वर्षीय तृप्ती कानविंदे म्हणाल्या, पोटच्या चार वर्षांच्या तान्हुल्याला ८० वर्षांच्या आईकडे ठेवून या मोर्चात सहभागी झाले आहे. तर शासकीय यंत्रणेवरचा रोष निफाडच्या ७० वर्षीय शोभबार्इंनी ‘लोकमत’कडे बोलताना व्यक्त केला.

टॅग्स :किसान सभा लाँग मार्च