Join us  

Kisan Long March : पोशिंद्याला धर्म नसतो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2018 5:19 AM

जगाचा पोशिंदा’ म्हणून ओळख असलेल्या शेतक-यांच्या मदतीसाठी सोमवारी आझाद मैदानात हजारो हात धावून आल्याचे पाहायला मिळाले. आपले पोट भरणारा पोशिंदा उपाशी राहू नये, म्हणून भाजपा वगळता सामाजिक संस्थांपासून राजकीय संघटनांनीही आंदोलकांच्या सकाळच्या नाश्तापासून दुपारच्या जेवणाची व्यवस्था केली होती.

मुंबई : ‘जगाचा पोशिंदा’ म्हणून ओळख असलेल्या शेतकºयांच्या मदतीसाठी सोमवारी आझाद मैदानात हजारो हात धावून आल्याचे पाहायला मिळाले. आपले पोट भरणारा पोशिंदा उपाशी राहू नये, म्हणून भाजपा वगळता सामाजिक संस्थांपासून राजकीय संघटनांनीही आंदोलकांच्या सकाळच्या नाश्तापासून दुपारच्या जेवणाची व्यवस्था केली होती. पोशिंद्याला जात-धर्म नसतो, तो केवळ पोशिंदा असतो, हे त्याच्या मदतीसाठी धावून आलेल्या हजारो हातांनी दाखवून दिले.या पाहुणचारात लक्ष वेधले, ते शेतकरी कामगार पक्षाने दुपारच्या जेवणासाठी केलेल्या सव्वा लाख भाकºया आणि चटणीने. याउलट सकाळपासून शिवसेनेचे विभागाध्यक्ष पांडुरंग सपकाळ यांनी बिस्किटे, पाणी आणि रुग्णवाहिकेची व्यवस्था केली. तर समाजवादी पार्टीच्या कार्यकर्त्यांनी आंदोलकांना सकाळी नाश्ता, तर दुपारी जेवणात पुरी-भाजीची व्यवस्था केली. खालसा एड या शीख संघटनेने आंदोलकांची तहान भागविण्यासाठी सकाळपासून सायंकाळपर्यंत पिण्याच्या पाण्याचे वाटप केले. विविध सामाजिक संस्थांनी आंदोलकांना बिस्किटे, ज्यूस, फळे, पिण्याचे पाणी आणि अल्पोपाहाराची व्यवस्था केली.ते आहेत म्हणूनच आपले पोट भरतेमुस्लीम समाजाचे नेतृत्वकरणाºया जमाएत उलेमा ए महाराष्ट्र संस्थेमार्फत ५०हून अधिक मुस्लीम बांधव आंदोलकांना फळे, फरसाण, ज्यूस आणि पिण्याच्या पाण्याचे वाटप करत होते. जगाचे पोट भरणाºया शेतकºयाला जात-धर्म नसतो, ते आहेत म्हणून आपले पोट भरते, अशी प्रतिक्रिया संस्थेचे अध्यक्ष मोहम्मदअय्युब यांनी ‘लोकमत’शी बोलतानाव्यक्त केली.>आमदार कपिल पाटील, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे, आमदार जे.पी. गावित, किसान सभेचे कॉम्रेड अशोक ढवळे व डॉ. अजित नवले या वेळी हजर होते.त्यांच्यासह वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन, आ.जयंत पाटील, खा. सीताराम येंचुरी, सीपीआयचे नेते नरसय्या आडाम यांनी मागण्या मान्य झाल्याची घोषणा केली.>डॉक्टर आले धावून...मुंबई : मोर्चेकºयांच्या मदतीला डॉक्टर धावून आले. आझाद मैदान परिसरात काही सामाजिक संस्था, राजकीय पक्षांनी वैद्यकीय सुविधा पुरविल्या होत्या. पाय सुजणे, फोड येणे, भेगा पडणे, चक्कर येणे, शरीरातील पाण्याची पातळी कमी होणे अशा मोर्चेकºयांच्या अनेक तक्रारींवर, डॉक्टरांनी मोफत उपचाराची फुंकर घालून मदतीचा हात दिला. सर जे. जे. रुग्णालयाच्या डॉक्टरांनी जवळपास ६५० मोर्चेकरी शेतकºयांवर उपचार करण्यात आले. यात डिहायड्रेशनचे १८० रुग्ण, तर अंगदुखीचे ३५० रुग्ण आढळले.

टॅग्स :किसान सभा लाँग मार्च