Join us  

Kisan Long March : किसान मार्चने पूर्ण केली दांडी मार्चची ८८ वर्षे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2018 5:09 AM

ब्रिटिशांविरोधात लोकांना एकत्रित आणण्यासाठी मिठावरील कराच्या निमित्ताने, महात्मा गांधी यांनी साबरमती येथून १२ मार्च १९३० रोजी दांडी मार्चची सुरुवात केली होती. गांधीजींनी ब्रिटिशांना देशाबाहेर काढण्याचा निर्धार केला होता.

मुंबई- ब्रिटिशांविरोधात लोकांना एकत्रित आणण्यासाठी मिठावरील कराच्या निमित्ताने, महात्मा गांधी यांनी साबरमती येथून १२ मार्च १९३० रोजी दांडी मार्चची सुरुवात केली होती. गांधीजींनी ब्रिटिशांना देशाबाहेर काढण्याचा निर्धार केला होता. त्या दांडी मार्चला आज ८८ वर्षे पूर्ण होत आहेत. आज शेतकरीही त्यांच्या मागण्यांसाठी हजारोंच्या संख्येने लाँग मार्च घेऊन नाशिकहून या आझाद मैदानात धडकले आहेत. या आधीही शेतकºयांच्या मागण्या पूर्ण करण्याच्या नावाखाली सरकारकडून दोन वेळा फसवणूक झाली आहे. त्यामुळे मागण्या पूर्ण झाल्या नाहीत, तर सरकारला सत्तेवरून खाली खेचण्याचा निर्धार करावा लागेल, असा सूचक इशारा किसान सभेचे केंद्रीय नेतेखा. सीताराम येंचुरी यांनी दिला.>गरिबांना गरीब, श्रीमंतांना अधिक श्रीमंत केले!देशातील एकूण संपत्तीच्या १ टक्का लोकांच्या हाती चार वर्षांपूर्वी ४९ टक्के संपती होती. मात्र, सरकारच्या भांडवलवादी धोरणांमुळे देशातील १ टक्के लोकांच्या हाती आता ७३ टक्के संपत्ती एकवटली आहे. यावरून सरकारमुळे देशातील गरीब आणखी गरीब झाला असून, श्रीमंत अधिक श्रीमंत झाल्याचे दिसते. सरकारी बँकांतील ११ लाख कोटी रुपये भांडवलदारांकडे थकले आहेत. त्यातील अर्धे रुपये जरी वसूल केले, तरी शेती क्षेत्राचे सर्व प्रश्न सुटतील. मात्र, देशातील अन्नधान्य उत्पादनाचे प्रमाण कमी करून, येथील जमिनी भांडवलदारांच्या घश्यात घालण्याचे षड्यंत्र सुरू आहे. जेणेकरून परदेशातील भांडवली कंपन्यांकडून अन्न-धान्याची आयात करता येईल. त्यामुळे या शेतकरी विरोधी धोरणांविरोधात लढा देण्यासाठी देशातील शेतकºयांना या आंदोलनातून ऊर्जा मिळेल.- खा. सीताराम येंचुरी,किसान सभेचे केंद्रीय नेतेकर्जमुक्तीच्यादिशेने लढा सुरूच!कर्जमाफीबाबत काही अटी शिथिल झाल्या असून, कर्जमुक्तीच्या दिशेने आज चार पावले पुढे गेलो आहोत. मात्र, हे आंदोलन येथेच थांबलेले नाही. शेतकºयांचा सातबारा पूर्णपणे कोरा होत नाही, तोपर्यंत लढा सुरू राहील.- डॉ. अजित नवले,सचिव-किसान सभाऐतिहासिक निर्णय!शेतकºयांच्या शिष्टमंडळासह मुख्यमंत्र्यांची सुमारे साडेतीन तास मॅरेथॉन बैठक चालली. त्यात बहुतेक मागण्या मान्य करत, तशी लेखी हमी देण्यात आली. मुख्य सचिवांच्या सहीने ही लेखी हमी शेतकºयांना देण्याची ही पहिलीच वेळ आहे. शेतकºयांनी केलेल्याया सर्व मागण्यांबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मंगळवारी सभागृहात निवेदन करत, पटलावर मांडणार आहेत.- चंद्रकांत पाटील, महसूलमंत्री.आश्वासन नको, निर्णय घ्यासरकारच्या चुकीच्या धोरणामुळे राज्यात १३ हजारांहून अधिक शेतकºयांना आत्महत्या करावी लागली. बोंडअळीग्रस्त, गारपीटग्रस्त शेतकºयांना अद्याप मदत मिळालेली नाही. त्यामुळे आश्वासन देणाºया सरकारने निर्णय घ्यावेत. पाय रक्तबंबाळ होईपर्यंत मोर्चा काढणाºया शेतकºयांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम सरकारचे प्रतिनिधी करत आहेत. सरकारला खाली खेचल्याशिवाय शेतकरी, आदिवासींचे प्रश्न सुटणार नाही.- खा. अशोक चव्हाण, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष.मंत्र्यांची धावाधाव ही तर नौटंकी!शेतकºयांची ताकद आणि निर्धार बघून मुख्यमंत्र्यांना धडकी भरली. त्यामुळे मोर्चाच्या आदल्या रात्री मुख्यमंत्र्यांच्या आदेशावरून मंत्र्यांनी धावाधाव करण्याची नौटंकी केली. मात्र, या नौटंकीला शेतकरी फसणार नाहीत. शेतकºयांच्या खाद्यांला खांदा लावून राष्ट्रवादी पार्टी न्याय मिळेपर्यंत लढा देईल.- धनंजय मुंडे, विरोधी पक्षनेते-विधान परिषद.शेतकरी सरकारचाअंत करणार!सरकारने शेतकºयांचा अंत पाहू नये, नाहीतर शेतकरी सरकारचा राजकीय अंत करतील. या लाल वादळाच्या हालअपेष्टा मुंबईकरांना दिसल्या. त्यामुळे मुंबईकरांच्या संवेदनाही जगाला दिसल्या. सत्ता ही क्षणाधार्थ कोसळू शकते, हे या लाँगमार्चमधून दिसते. सरकारने या मोर्चाच्या माध्यमातून आपल्या संवेदना जागृत कराव्यात.- सुनील तटकरे,राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष

टॅग्स :किसान सभा लाँग मार्च