Join us

कीर्तिकरांना बहुमतांनी विजयी करणार, आघाडीच्या नेत्यांचा एल्गार !

By मनोहर कुंभेजकर | Updated: May 16, 2024 19:16 IST

 शिवसेना नेते आमदार अँड.अनिल परब, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे राष्ट्रीय सचिव-राष्ट्रीय प्रवक्ते नरेंद्र वर्मा,महिला  विभागसंघटक राजुल पटेल, शिवसेना उपनेत्या संजना घाडी आदी मान्यवर नेत्यांनी आपल्या भाषणात महायुतीचे उमेदवार रवींद्र वायकर यांचा खरपूस समाचार घेतला. 

मुंबई: महाविकास आघाडीचे व उद्धव सेनेचे मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार अमोल कीर्तिकर यांच्या प्रचारार्थ वर्सोवा विधानसभेतील जोगेश्वरी पश्चिम बेहरामबाग नाका येथे जाहीर सभा पार पडली. यावेळी त्यांना बहुमतांनी विजयी करणार असा एकमुखी एल्गार महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केला.

 शिवसेना नेते आमदार अँड.अनिल परब, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे राष्ट्रीय सचिव-राष्ट्रीय प्रवक्ते नरेंद्र वर्मा,महिला  विभागसंघटक राजुल पटेल, शिवसेना उपनेत्या संजना घाडी आदी मान्यवर नेत्यांनी आपल्या भाषणात महायुतीचे उमेदवार रवींद्र वायकर यांचा खरपूस समाचार घेतला. 

यावेळी माजी स्थायी समिती अध्यक्ष शैलेश फणसे,काँग्रेस जिल्हाध्यक्ष कलाईव्ह डायस, महाविकास इंडिया आघाडीचे अन्य मान्यवर नेते व विभागातील महाविकास आघाडीचे अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते व स्थानिक जनता मोठ्या संख्येने या प्रचार सभेला उपस्थित होती.  

टॅग्स :अमोल कीर्तिकरमहाविकास आघाडी