Join us

मुंबई उपाध्यक्षपदी किरीट भंसाली यांची निवड

By admin | Updated: November 16, 2016 04:58 IST

पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई भाजपाची कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली आहे. युवा मोर्चाच्या अध्यक्षपदाची महत्त्वपूर्ण

मुंबई : पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई भाजपाची कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली आहे. युवा मोर्चाच्या अध्यक्षपदाची महत्त्वपूर्ण जबाबदारी मोहित कंबोज यांच्याकडे सोपविण्यात आली असून, मुंबई उपाध्यक्षपदी किरीट भंसाली यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर समाजातील सर्वच घटकांना नव्या कार्यकारिणीत स्थान देण्यात आले आहे. मुंबई उपाध्यक्ष म्हणून प्रसिद्ध हिरे व्यापारी किरीट भंसाली यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विविध सामाजिक कार्यात भंसाली यांचा सहभाग असून, व्यापारी वर्गातही मृदूभाषी आणि सयंत व्यक्तिमत्त्व असा त्यांचा परिचय आहे. उत्तर भारतीय मोर्चाची जबाबदारी सांभाळणाऱ्या मोहित कंबोज यांच्याकडे युवा मोर्चा सुपुर्द करण्यात आला आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत युवा मतदारांनी भाजपाला साथ दिल्याने पक्षाला मोठे यश मिळाले होते. पालिका निवडणुकीच्या दृष्टीने युवा मोर्चाच्या माध्यमातून तरुण मतदार भाजपाशी जोडण्याचा आमचा प्रयत्न असणार असल्याचे मोहित कंबोज यांनी आपल्या नव्या नियुक्तीनंतर बोलताना सांगितले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या युवा नेतृत्वाखाली विकासाकडे राज्याची वाटचाल सुरू आहे. युवा वर्गाच्या आशाआकांक्षांना बळ मिळेल, याच धोरणावर मुख्यमंत्री काम करीत आहेत. युवा मोर्चाच्या माध्यमातून तरुणांना पक्षाशी जोडणे आणि नवीन नेतृत्वाला संधी देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे कंबोज यांनी सांगितले. (प्रतिनिधी)