Join us

लोकमान्यांचा वारसा जपणारा ‘खेरवाडीचा राजा’

By admin | Updated: September 7, 2014 01:12 IST

गणोशोत्सवामागचा लोकमान्यांचा हेतू जपला जाईल याची पुरेपूर काळजी वांद्रे येथील ‘खेरवाडीचा राजा’ मंडळाकडून घेण्यात येत आहे. मंडळाचे यंदाचे 54 वे वर्ष आहे.

वांद्रे : गणोशोत्सवामागचा लोकमान्यांचा हेतू जपला जाईल याची पुरेपूर काळजी वांद्रे येथील ‘खेरवाडीचा राजा’ मंडळाकडून घेण्यात येत आहे. मंडळाचे यंदाचे 54 वे वर्ष आहे.
मंडळ गेली 54 वर्षे सातत्याने शाडूच्या मातीच्या मूर्तीची स्थापना करते. तरुणांचा सहभाग अधिक असल्याचे अध्यक्ष दीपक भोसले यांनी सांगितले. तरुणाईची पर्यावरणाप्रती असलेली बांधिलकी फारच वाखाणण्याजोगी असल्याचे भोसले यांनी सांगितले.
गणोशोत्सवाचा मूळ उद्देश लक्षात घेऊन या काळात विविध स्पर्धा राबवण्यात येतात. लहानग्यांसाठी तसेच महिलांसाठी पाककलासारख्या स्पर्धाही घेण्यात येतात, जेणोकरून सर्वानाच गणोशोत्सवात सहभागी होता यावे. तसेच रक्तदान शिबिर, वैद्यकीय चाचणी शिबिर, मुलांना वह्या, पुस्तकांचे वाटप यांसारखे उपक्रमही राबवण्यात मंडळ यशस्वी होत 
आहे. 
यंदा गणोशमूर्ती स्थापन केलेल्या मंडपात ‘सीता हरण’ या विषयावर अप्रतिम  देखावा साकारण्यात आला आहे. आजच्या पिढीला रामायण, महाभारत यांसारख्या पौराणिक महाकाव्यांविषयी माहिती व्हावी, हा मंडळाचा उद्देश आहे. 
तसेच या महाकाव्यांतील पक्षी व प्राणी यांचा सहभाग अतिशय महत्त्वाचा होता. म्हणूनच वन्यजीवांचे रक्षण करण्याचा उपदेशही याद्वारे दिला जात आहे. तसेच याचे वैशिष्टय़ असे, की हा सर्व देखावा इकोफ्रेंडली पद्धतीनेच साकारण्यात आला आहे. थर्माकॉल, प्लास्टिक यांचा वापर न करता कागदापासून हा देखावा तयार करण्यात आला आहे. 
सामाजिक बांधिलकी आणि परंपरांविषयीची जाण या मंडळाने सदैव जपली आहे. तरुण पिढीनेही या परंपरांचे कसोशीने पालन केले आहे. मंडळाच्या गणोशोत्सवात दरवर्षी  लागणारी भाविकांची रीघ याचीच साक्ष देते. (प्रतिनिधी)