Join us

‘इंटरनेटचा राजा’ बहुमान मिळवण्यासाठी रंगली चुरस

By admin | Updated: September 7, 2014 01:10 IST

गणोशोत्सवात सर्व काही स्पेशल असते. आपला गणोशोत्सव हटके पद्धतीने साजरा करण्यासाठी प्रत्येक जण धडपडत असतो.

रोहित नाईक ल्ल मुंबई
गणोशोत्सवात सर्व काही स्पेशल असते. आपला गणोशोत्सव हटके पद्धतीने साजरा करण्यासाठी प्रत्येक जण धडपडत असतो. त्यातच गेल्या तीन वर्षापासून महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशभरातील आणि जगभरातील गणोशभक्तांमध्ये विशेष गाजत असलेल्या स्पर्धेद्वारे आपल्या गणरायाला ‘इंटरनेटचा राजा’ बहुमान मिळवून देण्यासाठी सध्या मोठी चुरस रंगली आहे. 
जगभरातील सर्व गणोशोत्सवांचे दर्शन एकाच ठिकाणी व्हावे या उद्देशाने ¬षभ वसा आणि हमरोश रॉय या तरुणांनी े18ं1ी.ूे संकेतस्थळाची निर्मिती केली. 2क्11 साली सुरू झालेल्या या स्पर्धेचे यंदाचे चौथे वर्ष असून आतार्पयत 43 घरगुती आणि 28 सार्वजनिक गणपतींचे फोटो अपलोड झाले आहेत.
विनामूल्य असलेली ही स्पर्धा घरगुती आणि सार्वजनिक गणपती अशा दोन मुख्य गटांत होते. तसेच पर्यावरणाला चालना देण्यासाठी ‘इकोफ्रेंडली गणपती’ असा विशेष पुरस्कारदेखील या स्पर्धेत दिला जातो. ज्या गणपतीला सर्वाधिक ‘वोट’ मिळतील त्या गणपतीला ‘इंटरनेटचा राजा’ बहुमान मिळतो. मात्र असे जरी असले तरी वोट देताना होणारी चीटिंग रोखण्यासाठी स्पर्धेच्या आयोजकांनी नामी शक्कलदेखील लढवली आहे.
त्यानुसार प्रत्येकाला स्पर्धेत सहभागी होण्यासाठी किंवा वोट करण्यासाठी सर्वप्रथम या संकेतस्थळावर स्वत:चे प्रोफाइल बनवावे लागते. त्यानंतरच आपल्या बाप्पाचे फोटो अपलोड किंवा वोट करता येते. तसेच प्रत्येक प्रोफाइलवरून प्रत्येक गणपतीला केवळ एकच वोट देता येत असल्याने चीटिंगदेखील होत नाही.
गणोशोत्सवामध्ये सारेच बाप्पाची सेवा करण्यात गुंतलेले असल्याने काहींना या स्पर्धेत सहभागी होण्यास वेळदेखील मिळणार नाही. यासाठीच आयोजकांनी स्पर्धेत सहभागी होण्यासाठी 11 सप्टेंबर रात्री 12 वाजेर्पयत शेवटची वेळ ठरवली आहे. जेणोकरून जास्तीत जास्त भक्तांना या स्पर्धेत सहभागी होता येईल. 
तेव्हा अजूनही सर्वासाठी ही स्पर्धा खुली असून मोठय़ा संख्येने स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.(प्रतिनिधी)
 
च्सर्वप्रथम े18ं1ी.ूे संकेतस्थळावर स्वत:चे प्रोफाइल बनवा.
च्यानंतर आपल्या बाप्पाचे फोटो अपलोड करा.
च्वोट करा आणि आपल्या हितचिंतकांनादेखील वोट करण्यास सांगा.