Join us

पोलीस शिपायाची निर्घृण हत्या

By admin | Updated: September 14, 2014 03:01 IST

वेश्याव्यवसाय करणा:या तरुणीने तीन साथीदारांच्या मदतीने पोलीस शिपायाची निर्घृण हत्या केल्याचे उघडकीस आले.

हत्येनंतर जाळला मृतदेह : वेश्याव्यवसाय करणारी तरूणी अटकेत
मुंबई : वेश्याव्यवसाय करणा:या तरुणीने तीन साथीदारांच्या मदतीने पोलीस शिपायाची निर्घृण हत्या केल्याचे उघडकीस आले. दिलीप बोलाटे असे हत्या झालेल्या पोलीस शिपायाचे नाव आहे. ते वांद्रे पोलीस ठाण्यात काम करत होते.
शुक्रवारी दुपारी दोनच्या सुमारास बोलाटे यांचा अर्धवट जळालेला मृतदेह जुहू-तारा रोडवरील इंदिरानगर झोपडपट्टीतील घरात आढळला. हत्येचा गुन्हा नोंदवून सांताक्रुज पोलिसांनी तपास सुरू केला. परिसरातील एका गणोशोत्सव मंडळाने लावलेल्या सीसीटीव्हींच्या चित्रणाच्या मदतीने पोलिसांनी वेश्याव्यवसाय करणा:या मधू उर्फ भारती यादव या तरूणीला गजाआड केले. तिने हत्येची कबुली दिली असून, तूर्तास हत्येमागील हेतू व हत्येत मदत करणारे तीन साथीदार याबाबत विचारपूस सुरू आहे. उद्या तिला न्यायालयात हजर केले जाईल, अशी माहिती पोलिसांनी दिली.
मोटार परिवहन विभागात असताना बोलाटेंची मधूशी ओळख झाली होती. इंदिरा नगरात ज्या खोलीत बोलाटे यांचा अर्धवट जळालेला मृतदेह आढळला ती खोली मधूने काही दिवसांपूर्वी भाडय़ाने घेतली होती. (प्रतिनिधी)
 
अवैध संबंध, वाद आणि घात
च्मधू व बोलाटे यांच्या अवैध संबंध होते. पैशांवरून दोघांमध्ये सतत वाद होत असत. त्याला कंटाळून मधूने बोलाटेंचा काटा काढण्याचा निर्णय घेतला. 
च्त्यासाठीच तिने भाडयाची खोली घेतली. बोलाटेंना तेथे बोलावून घेतले. त्यांना दारू पाजली. मधू व तिच्या तीन साथीदारांनी बोलाटेंची नशेत असताना नायलॉन दोरीने गळा आवळून हत्या केली. 
च्ओळख पटू नये यासाठी बोलाटेंचा मृतदेह गादीत गुंडाळून गादी पेटवली. मधू, तिचे साथीदार घराला कुलुप लावून तेथून निघून गेले. मात्र शेजा:यांनी घरातून येणारा धूर पाहून पोलिसांना फोन केला. 
त्या गादीत पोलिसांना बोलाटेंचा मृतदेह आढळला.
 
वाहनचालक म्हणून करत होत काम
मुंबई पोलिसांच्या मोटार परिवहन विभागात 
रूजू झालेले बोलाटे कुटुंबासह कल्याण येथे 
राहात होते. महिन्याभरापुर्वीच त्यांची नेमणूक वांद्रे पोलीस ठाण्यात वाहनचालक म्हणून झाली होती. त्याआधी काही काळ त्यांनी सांताक्रुज पोलीस ठाण्यातही काम केले होते.