Join us
Daily Top 2Weekly Top 5

चविष्ट जेवण न बनविल्याच्या रागात एकाची हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:08 IST

दहिसरमधील घटना; बिगारी कामगाराला अटकलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : चविष्ट जेवण न बनविल्याच्या रागात दहिसरमध्ये दोघांवर जीवघेणा हल्ला ...

दहिसरमधील घटना; बिगारी कामगाराला अटक

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : चविष्ट जेवण न बनविल्याच्या रागात दहिसरमध्ये दोघांवर जीवघेणा हल्ला करण्यात आला. यात एकाचा मृत्यू झाला, तर दुसऱ्यावर उपचार सुरू आहेत. या प्रकरणी पोलिसांनी हल्लेखोराला अटक केली.

विनोद नायक (वय ३२) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून, ताे दहिसरमध्ये मंदाकिनी जंक्शन येथील एका खासगी विकासकाच्या इमारतीत बिगारी काम करतो. त्याच ठिकाणी असलेल्या पत्र्याच्या खोलीत अन्य चारजणांसोबत राहत होता. त्यांच्यापैकी स्वयंपाक बनविणारा कालिया नायक आणि रवींद्र नायक यांच्यासोबत विनाेदचे कमी जेवण बनविणे, उशिरा बनविणे किंवा चविष्ट न बनविणे यावरून वाद व्हायचे. मंगळवारीही (दि. २) चविष्ट जेवण नसल्यावरून त्यांच्यात भांडण झाले आणि रागाच्या भरात विनोदने कालिया व रवींद्रच्या डोक्यात लोखंडी फावड्याने हल्ला चढविला. यात कालियाला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला, तर रवींद्रही गंभीर जखमी झाला.

दहिसर पोलिसांनी विनोदवर गुन्हा दाखल केला असून त्याला अटक करण्यात आली. त्याला स्थानिक न्यायालयात हजर केले असता पोलीस कोठडी सुनावण्यात आल्याचे वरिष्ठ पाेलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.

..........................