Join us

सावत्र आईकडून चिमुरडीची हत्या

By admin | Updated: December 1, 2015 09:51 IST

सहा वर्षांच्या चिमुरडीची सावत्र आईने हत्या केल्याची काळीज सुन्न करणारी घटना भांडुपमधील जंगल मंगल रोड परिसरात सोमवारी घडली. पायल राजेश सावंत असे या निष्पाप बालिकेचे

मुंबई : सहा वर्षांच्या चिमुरडीची सावत्र आईने हत्या केल्याची काळीज सुन्न करणारी घटना भांडुपमधील जंगल मंगल रोड परिसरात सोमवारी घडली. पायल राजेश सावंत असे या निष्पाप बालिकेचे नाव असून, सावत्र आई प्रतीका राजेश सावंत (२५) हिला पोलिसांनी अटक केली. खासगी कंपनीत काम करीत असलेल्या राजेशच्या पहिल्या पत्नीचे वर्षभरापूर्वी निधन झाले होते. त्याची गतिमंद मुलगी पायलचा सांभाळ करण्यास त्याने काही महिन्यांपूर्वी प्रतीकाशी विवाह केला. मात्र ती पायलचा तिरस्कार करीत असे. पती कामावर निघून गेल्यानंतर विविध वस्तू गरम करून चटके देणे, मारहाण करणे, जेवणासाठी ताटकळत ठेवणे अशा प्रकारे प्रतीका पायलवर अत्याचार करत होती. दोन दिवसांपूर्वी राजेश भावासोबत नाशिक येथील नातेवाइकांच्या घरी गेले होते. सोमवारी दुपारी जेवायला मागितले असता प्रतीकाने तिला मारहाण करत भिंतीवर ढकलून दिले. त्यात ती बेशुद्ध पडली. तिला मुलुंड येथील अग्रवाल रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. चटके दिल्याच्या २० खुणापायलच्या अंगावरील जखमा पाहून पोलिसांसह डॉक्टरही हादरून गेले. कपाळापासून तळव्यापर्यंत तब्बल २०पेक्षा जास्त चटके दिल्याच्या खुणा आढळून आल्या. धक्कादायक म्हणजे, प्रतीकाने चिमुकलीच्या डोळ्यांनाही चटके देण्याचा प्रयत्न केला होता.