Join us

पोलिसांच्या स्वाधीन करण्याची भीती दाखवून अपहरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2021 04:06 IST

दहिसर पोलिसांकडून दोघांना अटकलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : महिलेला धडक दिली म्हणून त्याला पोलिसांच्या स्वाधीन करतो असे सांगून ...

दहिसर पोलिसांकडून दोघांना अटक

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : महिलेला धडक दिली म्हणून त्याला पोलिसांच्या स्वाधीन करतो असे सांगून दुकलीने त्याचे अपहरण करून लुबाडले. याप्रकरणी दहिसर पोलिसांना समजताच त्यांनी बुधवारी दोघांना अटक केली.

दहिसर परिसरात तक्रारदार हर्ष पांचाळ (२२) त्याच्या दुचाकीवरून निघाला असताना एका महिलेला त्याची धडक बसली. त्यामुळे तिच्या हातातील मोबाइल खाली पडला. रागाने तिने आरडाओरड करून स्थानिकांना गोळा केले. मात्र पांचाळने तिची माफी मागताच ती शांतपणे तिथून निघून गेली. हा सर्व प्रकार तेथीलच एका रिक्षात बसलेल्या मनीष शिंदे व महेश मोरे यांनी पाहिला. ते दोघे पांचाळ याच्याजवळ गेले आणि त्याच्याशी हुज्जत घालत त्याला पोलीस ठाण्यात नेतो, असे सांगून जबरदस्ती रिक्षात बसविले. त्यानंतर त्यांना निर्जनस्थळी नेऊन मारहाण करून त्याचे दहा हजार रुपये हिसकावत पळ काढला. पांचाळ याने याप्रकरणी दहिसर पोलिसांत तक्रार करताच पाेलिसांनी तपासाअंति दोघाना अटक केली.

..................................