Join us  

खारच्या व्यावसायिकाला सव्वा कोटीचा गंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 06, 2018 7:11 AM

पेपर विक्री करणा-या व्यावसायिकाला पाच जणांनी तब्बल १ कोटी ३४ लाखांचा गंडा घातल्याची घटना वांद्रे येथे सोमवारी उघडकीस आली. वांद्रे न्यायालयाच्या आदेशाने वांद्रे पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

मुंबई - पेपर विक्री करणा-या व्यावसायिकाला पाच जणांनी तब्बल १ कोटी ३४ लाखांचा गंडा घातल्याची घटना वांद्रे येथे सोमवारी उघडकीस आली. वांद्रे न्यायालयाच्या आदेशाने वांद्रे पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.खार पश्चिमेकडील परिसरात व्यावसायिक निकुज परमानंद शाह (५९) हे कुटुंबीयांसोबत राहतात. त्यांचा विविध प्रकारच्या पेपर विक्रीचा व्यवसाय आहे. किरिट सत्रा, कल्पेश सत्रा, भरत सत्रा, हरेश सत्रा, मे. इक्लेट पेपर छछढ यांनी शाह यांच्याशी ओळख केली. त्यांच्या कंपनीकडून वेगवेगळ्या क्वालिटी पेपरचा माल खरेदी करून विश्वास संपादन केला. शाह यांच्यासोबत जवळीक वाढवली. त्यानंतर पाच जणांनी आपापसांत संगनमत करून त्यांनी एकमेकांच्या प्रोपरायटर कंपनीमध्ये भागीदार नसताना एका कंपनीच्या कन्फर्मेशन लेटर, चलान तसेच अ‍ॅक्नॉलेजमेंटवर दुसºया कंपनीच्या प्रोपरायटरने सह्या केल्या. आणि शाह व त्यांच्या दोन भागीदारांना गंडवल्याचा आरोप शाह यांनी केला आहे. त्यांनी शाह यांच्या कंपनीकडून जवळपास १ कोटी ३४ लाख ६७ हजार ११७ रुपयांचा माल खरेदी केला; आणि परस्पर त्याचा व्यवहार करून शाह यांना खरेदीचे पैसे दिले नाहीत. शाह यांनी त्यांच्याकडे पैशांची मागणी केली. मात्र त्यांनी उडवाउडवीचे उत्तरे देण्यास सुरुवात केली. यामध्ये आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी वांद्रे न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाच्या आदेशाने वांद्रे पोलिसांनी सोमवारी या प्रकरणी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. त्यांनी केलेल्या व्यवहारावरून पोलीस अधिक तपास करीत आहेत. अद्याप कुणालाही अटक करण्यात आलेली नाही. या प्रकरणी अधिक तपास सुरू असल्याची माहिती वांद्रे पोलिसांनी दिली.

टॅग्स :गुन्हा