मुंबई : नव्याने सुरू झालेल्या खारघर येथील टोलनाक्याविरोधात उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल झाली असून, याची दखल घेत न्यायालयाने याचे प्रत्युत्तर सादर करण्याचे आदेश राज्य शासनाला दिले आहेत़एका सामजिक कार्यकर्त्याने ही याचिका केली आहे़ येथील पायाभूत सुविधांचा अभ्यास न करताच हा टोलनाका सुरू करण्याची अधिसूचना जारी करण्यात आली, असा आरोप याचिकेत करण्यात आला आहे़ मुख्य न्यायाधीश मोहित शहा व न्या़ बी़पी़ कुलाबावाला यांच्या खंडपीठासमोर या याचिकेवर सुनावणी झाली़ त्यात मुख्य सरकारी वकील अभिनंदन वग्यानी यांनी याचे प्रत्युत्तर सादर करण्यास वेळ मागितला़ त्यास परवानगी देत न्यायालयाने ही सुनावणी दोन आठवड्यांसाठी तहकूब केली़ (प्रतिनिधी)
खारघर टोलनाक्याविरोधातहायकोर्टात याचिका
By admin | Updated: January 10, 2015 02:07 IST