Join us
Daily Top 2Weekly Top 5

खोपोलीत महिलेस बेदम मारहाण

By admin | Updated: November 18, 2014 22:43 IST

नगरपालिका हद्दीतील शिळफाटा पटेलनगर येथे क्षुल्लक कारणावरुन महिलेस व त्यांच्या नातेवाइकांना बेदम मारहाण केल्याची घटना सोमवारी सायंकाळी घडली.

वावोशी : नगरपालिका हद्दीतील शिळफाटा पटेलनगर येथे क्षुल्लक कारणावरुन महिलेस व त्यांच्या नातेवाइकांना बेदम मारहाण केल्याची घटना सोमवारी सायंकाळी घडली. खोपोली पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पटेलनगर शिळफाटा येथील रेश्मा साळुंके यांच्या तक्रारीनुसार, त्यांच्या भाच्याशी कासीम महंमद वंडे, निशाद राजपूत, सोहेल व अन्य एकजणाने क्षुल्लक कारणावरुन भांडण केले. त्यामुळे कासीम व त्यांचे तीन सहकारी यांनी रेश्मा साळुंकेचे पती राम साळुंके, गोविंद पवार व मोहन पवार यांना शिवीगाळ, दमदाटी करुन लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. यावेळी मध्ये पडलेल्या रेश्मा यांनाही धक्काबुक्की करून अश्लील वर्तन करण्याचा प्रयत्न केला. (वार्ताहर)