Join us
Daily Top 2Weekly Top 5

विदर्भापाठोपाठ खान्देशही होरपळला, उष्णतेची लाट; वृद्धाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2018 05:42 IST

उष्णतेच्या लाटेत विदर्भ, खान्देश अक्षरक्ष: होरपळून गेला आहे.

मुंबई/पुणे : उष्णतेच्या लाटेत विदर्भ, खान्देश अक्षरक्ष: होरपळून गेला आहे. अमरावतीमध्ये वृद्धाचा उष्माघाताने मृत्यू झाला. जळगावचा पारा एकाच दिवसात तीन अंशांनी वाढून ४५ वर पोहोचला आहे. गुरुवारी राज्यात सर्वात जास्त तापमान चंद्रपूर येथे ४७़६ अंश सेल्सिअस नोंदविले गेले़ विदर्भात पुढील दोन दिवस उष्णतेची लाट राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे़बहुतांश विदर्भात उष्णतेची लाट असून दुपारी अघोषीत संचारबंदी असल्यासारखी परिस्थिती पहायला मिळते. शेतात काम करण्यासाठी गेलेले बालाजी राघोजी खाकसे (७३, रा.तिवसा, जि. अमरावती) या वृद्धाचा उष्माघाताने मृत्यू झाला.विदर्भापाठोपाठ खान्देशही भाजून निघाला आहे. जळगावात मंगळवार व बुधवारी ढगाळ वातावरण होते.