मुंबई : विधानसभेतील विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे हे बुलडाणा येथील सभा टाळून सूर्यास्तापूर्वी मुंबईत दाखल होण्याकरिता हेलिकॉप्टरने रवाना झाल्याने खडसे यांच्या प्रकृतीबाबत राजकीय वतरुळात उलटसुलट चर्चाना ऊत आला. खडसे यांना काही कामाकरिता तातडीने मुंबईत यायचे होते. मात्र खडसे यांच्या पोटात दुखू लागल्याने ते तातडीने मुंबईत दाखल झाल्याची चर्चा सुरू झाली. याबाबत खडसे यांच्या कार्यालयाकडे विचारणा केली असता त्यांची प्रकृती उत्तम असल्याचे सूत्रंनी सांगितले. (विशेष प्रतिनिधी)