ठाणे : आपल्या आवडत्या मालिकेतील आवडत्या कलाकारांना भेटण्याची ओढ सर्वच रसिक प्रेक्षकांना असते. कलाकारांना प्रत्यक्ष भेटणे, त्यांच्याबरोबर आनंदाचे चार क्षण घालविणे ही कुठल्याही चाहत्यासाठी आयुष्यभराची आठवण असू शकते. स्टार प्रवाह वाहिनी हीच अमूल्य संधी खास ‘लोकमत’च्या वाचकांसाठी घेऊन आली आहे, 'चैत्र चाहूल २०१५: नव्या नात्यांची नवी गुढी' या कार्यक्रमाद्वारे. तुमच्या सर्वांचे आवडते ‘दुर्वा’, ‘तू जिवाला गुंतवावे’ आणि ‘जयोस्तुते’ या मालिकेतील कलाकार ठाणेकर प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. ७ मार्च २०१५ रोजी सायंकाळी ४.३० वाजता उपवन तलाव पोखरण रोड क्रमांक १, ठाणे पश्चिम येथे हा कार्यक्रम रंगणार आहे.या कार्यक्रमात या स्टार्सबरोबर गप्पा, धम्माल, मस्ती तर होणार आहेच, पण हे कलाकार प्रेक्षकांना स्टार प्रवाह वाहिनीवर २१ मार्च २०१५ रोजी रात्री ८ वाजता प्रसारित होणाऱ्या ‘चैत्र चाहूल २०१५' या कार्यक्रमाचे स्वत: निमंत्रण देणार आहेत.‘चैत्र चाहूल २०१५ : नव्या नात्यांची नवी गुढी’ या कार्यक्रमाद्वारे ‘दुर्वा’ मालिकेतील दुर्वा आणि केशव, ‘तू जीवाला गुंतवावे’ या मालिकेतील निनाद आणि अनन्या आणि ‘जयोस्तुते’ मालिकेतील उमा राजवाडे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. या व्यक्तिरेखांवर ठाणेकरांनी भरभरून प्रेम केले आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने ठाण्यातील प्रेक्षकांना या सर्व कलाकारांशी संवाद साधण्याची संधी मिळणार आहे. या कलाकारांबरोबर खास गप्पा तर रंगणार आहेतच, पण प्रेक्षकांसाठी विविध प्रकारचे फन गेम्स देखील आयोजित करण्यात येणार आहेत. अशा या धम्माल संध्याकाळची मजा ‘लोकमत’च्या जास्तीत जास्त वाचकांनी घ्यावी, असे आवाहन स्टार प्रवाह वाहिनीने केले आहे. अर्थात, प्रवेशसंख्या मर्यादित आहे. त्यामुळे वेळेत हजर राहून तुमची एन्ट्री पक्की करा. (प्रतिनिधी)
केशव - दुर्वा ‘लोकमत’ वाचकांच्या भेटीला
By admin | Updated: March 4, 2015 23:22 IST