मुंबई : वर्ल्ड कन्सलटिंग अॅण्ड रिसर्च कॉर्पोरेशन या संस्थेतर्फे देण्यात येणारा ‘ब्रॅण्ड आॅफ द ईअर २०१६’ पुरस्कार यंदा केसरी टूर्सला देऊन गौरविण्यात आले. उद्योग क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या कंपनीला दरवर्षी हा पुरस्कार दिला जातो. ब्रॅण्डची व्यापकता, दर्जा आणि ग्राहकांना दिली जाणारी सेवा हे निकष प्रामुख्याने पुरस्कारासाठी पाहिले जातात. केसरी टूर्स कंपनी या निकषांवर खरी उतरत असल्यामुळे यंदाचा पुरस्कार त्यांना देण्यात आला. लोंबा फाउंडेशनचे विश्वस्त अध्यक्ष लॉर्ड राज लोंबा यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमाला ट्रॅव्हल्स अॅण्ड हॉस्पिटॅलिटी क्षेत्रातील विविध मान्यवर उपस्थित होते. केसरी टूर्सतर्फे आंतरराष्ट्रीय सहलींचेही आयोजन करण्यात येते. या कंपनीचे उद्दिष्ट्य हे पर्यटकांच्या चेहऱ्यावर हास्य आणि आनंद खुलवणे हे आहे. ज्येष्ठ नागरिक, तरुणांसाठी विविध सहलींचे आयोजन केले जाते. त्याचबरोबर गु्रप आणि अन्य सहलींचे आयोजन केले जाते. (वाणिज्य प्रतिनिधी)
केसरी टूर्सला ‘ब्रॅण्ड आॅफ द ईअर’ पुरस्कार
By admin | Updated: January 8, 2017 02:25 IST