Join us
Daily Top 2Weekly Top 5

दुकानांचा परिसर स्वच्छ ठेवा!

By admin | Updated: November 9, 2014 00:27 IST

परिसर स्वच्छ ठेवणो बंधनकारक असून, यामधील कायदेशीर तरतुदीचे उल्लंघन केल्यास संबंधित आस्थापना मालकावर कारवाई करण्यात येईल,

मुंबई : प्रत्येक आस्थापना मालकाने आपली आस्थापना व आपल्या आस्थापनेचा परिसर स्वच्छ ठेवणो बंधनकारक असून, यामधील कायदेशीर तरतुदीचे उल्लंघन केल्यास संबंधित आस्थापना मालकावर कारवाई करण्यात येईल, असा इशारा मुंबई महानगरपालिका प्रशासनाने दिला आहे.
2 ऑक्टोबरपासून  ‘स्वच्छ भारत अभियान’ राबविण्यात येत असून  महापालिका आयुक्त सीताराम कुंटे यांच्या निर्देशानुसार व उपआयुक्त (विशेष) राजेंद्र वळे यांच्या मार्गदर्शनाखाली दुकाने व आस्थापना खात्यातील सर्व वरिष्ठ निरीक्षक, निरीक्षक व दुकान परिचर यांनी आपल्या विभागातील सर्व दुकानदारांना प्रत्यक्ष भेट देऊन कचराकुंडी ठेवण्याची व दुकानाभोवतालचा परिसर स्वच्छ ठेवण्याबाबत त्यांना आवाहन करत आहेत. तसेच संबंधित कर्मचा:यांनी दररोज सायंकाळी 6 ते रात्री 8 या वेळेत हे काम श्रमदान म्हणून करावे व त्याची नोंद नोंदवहीत घेण्यात यावी, असेही त्यांना सांगण्यात आले आहे. 
तरी आस्थापना मालकांनी पुरेशा क्षमतेची कचराकुंडी आपल्या आस्थापनेच्या बाहेर ठेवावी जेणोकरून नागरिकांना कचरा टाकणो सुलभ होईल. तसेच आपले शहर स्वच्छ व निरोगी ठेवण्यास मुंबई महानगरपालिकेस सहकार्य करावे, असे आवाहनही पालिका प्रशासनाने केले आहे. (प्रतिनिधी)
 
च्महापालिका कार्यालये, आस्थापना, उद्याने यामध्ये स्वच्छता राहावी म्हणून पालिका प्रशासनातर्फे मोठय़ा प्रमाणात स्वच्छतेचे कार्यक्रम हाती घेतले आहेत. त्याअनुषंगाने अतिरिक्त महापालिका आयुक्त (शहर) विकास खारगे यांनी पालिका मुख्यालयातील विविध खात्यांना भेट देऊन तेथे सुरू असलेल्या साफसफाई कामांची पाहणी केली. 
शिवाय खातेप्रमुख व अधिका:यांना योग्य ते 
निर्देश दिले.