मुंबई : शीना बोरा हत्याकांडातील आरोपी पीटर मुखर्जीला संजीव खन्ना आणि श्यामवर राय या इतर आरोपींपासून दूर आर्थर रोड तुरुंगातील अंत्यत कडोकोट सुरक्षा असलेल्या कोठडीत ठेवले जाईल, असे तुरुंग महानिरीक्षक बी. के. सिंग यांनी सांगितले.पीटर मुखर्जीला १४ डिसेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेली आहे. तुरुंगातील अन्य कैद्यांसारखी पीटर मुखर्जीला वागणूक दिली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.पीटर मुखर्जीला तुरुंगात काही धोका आहे काय? असे विचारले असता त्यांनी नकारात्मक उत्तर दिले. सीबीआय कोठडीदरम्यान पीटरला त्याच्या आवडीच्या रेस्टॉरन्टमधून भोजन दिले जायचे. तथापि, आर्थर रोड तुरुंगात तयार केलेले जेवणच पीटरला घ्यावे लागेल. पीटरला घरी तयार करण्यात आलेले जेवण किंवा औषधी देण्याबाबत आम्ही कोर्टात अर्ज केलेला नाही, असे पीटरच्या बाजुने हे प्रकरण हाताळणाऱ्या वकिलांच्या पथकातील सूत्राने सांगितले. (विशेष प्रतिनिधी)
खन्ना, रायपासून पीटर मुखर्जीला दूर ठेवणार
By admin | Updated: December 2, 2015 02:50 IST