Join us
Daily Top 2Weekly Top 5

गणेशोत्सवात स्वच्छता ठेवा! आयुक्तांचे सहाय्यक आयुक्तांना आदेश

By admin | Updated: September 1, 2015 21:38 IST

गणेशोत्सवात स्वच्छता ठेवा!

गणेशोत्सवात स्वच्छता ठेवा!
आयुक्तांचे सहाय्यक आयुक्तांना आदेश
मुंबई : मुंबई महानगरपालिका आयुक्त अजय मेहता यांनी मुंबईच्या २४ वॉर्डमधील सहाय्यक आयुक्तांची मंगळवारी पालिका मुख्यालयात बैठक घेतली. यावेळी गणेशोत्सव काळात स्वच्छचा ठेवण्याचे आदेश देत आयुक्तांनी गणेशोत्सव संदर्भातील परवानग्या आणि विसर्जन स्थळांचा आढावा या विषयांवर चर्चा केली.
गणेशोत्सव काळात मुंबई स्वच्छ ठेवण्याचे आदेश देत आयुक्तांनी सहाय्यक आयुक्तांना अंतर्गत मोठे व छोटे रस्ते, झोपड्या आणि गल्लीबोळांवर विशेष लक्ष केंद्रीत करण्यास सांगितले आहे. मुंबईत पाणीकपात लागू केली असली, तरी पाणी वाटपादरम्यान पक्षपात होणार नाही, असेही आयुक्तांनी स्पष्ट केले. शिवाय पाण्याची नासाडी न करता अधिकाधिक बचत करण्याचे आवाहन आयुक्तांनी केले आहे.
............