बदलापूर : कुळगाव-बदलापूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी राजेश कानडे यांना दीड महिन्यापूर्वी लाचलुचपत विभागाने लाच घेताना अटक केल्याच्या दिवसापासून पालिकेत मुख्याधिकारीपद हे प्रभारी स्वरूपात देण्यात आले आहे. आधी तहसीलदारांकडे, नंतर 15 दिवस प्रशिक्षणार्थी मुख्याधिकारी यांच्याकडे आणि आता पुन्हा तहसीलदारांकडे हे पद सोपविण्यात आले आहे. प्रभारी मुख्याधिकारी असल्याने प्रशासन लवकर निर्णय घेत नसल्याने शनिवारी सर्वपक्षीय नगरसेवकांनी एकत्रित येऊन पालिका कार्यालयालाच टाळे ठोकून स्वतंत्र कायमस्वरूपी मुख्याधिकारी देण्याची मागणी त्यांनी केली़
पालिकेचे मुख्याधिकारी हे पद गेल्या दीड महिन्यापासून रिक्त आहे. या पदाची जबाबदारी ही प्रभारी स्वरूपात तहसीलदार अमित सानप यांच्याकडे देण्यात आली आहे. त्यांच्याकडे अंबरनाथ तहसीलदार कार्यालयाचा कार्यभार तसेच ग्रामपंचायत निवडणुकीची मोठी जबाबदारी असल्याने त्यांना बदलापूर पालिकेत पूर्णवेळ बसणो शक्य नाही. ही तांत्रिक बाब जिल्हाधिका:यांना माहीत असतानाही बदलापूरसाठी स्वतंत्र मुख्याधिकारी देण्यात आला नाही. ठाणो, कल्याण-डोंबिवली आणि उल्हासनगर या महापालिकांमध्ये अनेक मुख्याधिकारी कॅडरचे अधिकारी काम करीत असून त्यांची तात्पुरती नेमणूक नवीन मुख्याधिकारी नेमण्यार्पयत करण्यात यावी, अशी मागणी याआधीच नगरसेवकांनी केली होती. मात्र, या मागणीकडेही दुर्लक्ष झाल्याने नगरसेवक वामन म्हात्रे, राजन घोरपडे, श्रीधर पाटील, राजेंद्र चव्हाण, शरद तेली, रमेश सोळसे, संजय गायकवाड, अविनाश मोरे आणि मंगेश धुळे या नगरसेवकांनी पालिकेतील सर्व अधिका:यांना कार्यालयाबाहेर काढून मुख्य प्रवेशद्वारालाच टाळे ठोकून काम बंद पाडले. दुपारी 12 वाजता कार्यालयाला टाळे ठोकल्यावर या सर्व नगरसेवकांनी प्रवेशद्वारासमोरच ठिय्या आंदोलन केल़े
अखेर, प्रभारी मुख्याधिकारी आणि तहसीलदार अमित सानप यांच्यासोबत चर्चा केल्यावर हे आंदोलन 3 वाजता मागे घेण्यात आले. तसेच महत्त्वाचे विषय तत्काळ मंजूर करण्याचे व मुख्याधिकारीबाबतची मागणी जिल्हाधिका:यांना पाठविण्याचे आश्वासन सानप यांनी दिले. (प्रतिनिधी)