Join us
Daily Top 2Weekly Top 5

केडीएमटीचे उत्पन्न प्रतिदिन १ लाखाने वाढले!

By admin | Updated: June 11, 2015 05:43 IST

कल्याण-डोंबिवली परिवहनला आर्थिक डबघाईतून बाहेर काढण्यासाठी दोन महिन्यांत ‘त्या’ अधिकाऱ्यांवर बडतर्फीसह बदलीची कारवाई केल्याने एप्रिल-मे महिन्यांत

अनिकेत घमंडी, डोंबिवलीकल्याण-डोंबिवली परिवहनला आर्थिक डबघाईतून बाहेर काढण्यासाठी दोन महिन्यांत ‘त्या’ अधिकाऱ्यांवर बडतर्फीसह बदलीची कारवाई केल्याने एप्रिल-मे महिन्यांत सुट्यांचे दिवस असूनही केडीएमटीचे उत्पन्न प्रतिदिन १ लाखाने वाढल्याचा दावा सभापती नितीन पाटील यांनी केला आहे. काहींचे साटेलोटे असल्यामुळे उत्पन्नावर परिणाम होत असल्याचे ते म्हणाले. सध्या दिवसाला सुमारे ६ लाख ९४ हजारांची उलाढाल असून आगामी काळात शाळा सुरू झाल्यावर त्यात ५०-७५ हजारांची भर पडण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली.अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या मनमानीला चाप लावून यापुढे ते प्रतिदिन १० लाखांपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट असल्याचे ते म्हणाले. प्रशासनातील महाव्यवस्थापक आणि डेपो अधिकारी, तिकीट चेकर यांना टीकेचे लक्ष्य करून त्यांनी तोफ डागली. त्यानुसार, महाव्यवस्थापकांना परत बोलवा, असा ठराव करून तो शासनाकडे पाठविला असून त्या डेपो अधिकाऱ्यांकडून चार्ज काढून घेण्यात आला आहे.