डोंबिवली : कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रातील हाजीमलंग पट्ट्यातील रस्त्यांचीही दयनीय अवस्था झाल्याने त्याचा फटका महापालिकेच्या परिवहन विभागाला बसला आहे. खड्ड्यांमुळे या भागात जाणाऱ्या वाहनांमध्ये तांत्रिक बिघाडांमुळे अपेक्षित फेऱ्यांची पूर्तता होत नसल्याने या भागातील नागरिकांना त्याचा त्रास होत आहे. परिवहनच्या या भोंगळ कारभारामुळे येथील खासगी वाहतुकीचे फावले असल्याने नागरिकांच्या विशेषत: विद्यार्थ्यांच्या खिशाला चाट बसत आहे. कल्याण-हाजीमलंग या मार्गावर केडीएमटीची बससेवा असून, दिवसाला साधारणत: ५० फेऱ्या होणे अपेक्षित असूनही पनवेलला जाणाऱ्या बस सोडल्या तर या भागात जाणाऱ्या केडीएमटीच्या बसफेऱ्यांची पूर्तता होत नसल्याचे आगार सूत्रांनी दिलेल्या माहितीवरून स्पष्ट झाले. याबाबत, शिवसेनेचे डोंबिवली शहरप्रमुख भाऊ चौधरी यांनीही या वृत्ताला दुजोरा देत रस्ते खराब असल्याचे स्पष्ट केले. (प्रतिनिधी)
केडीएमटीची सेवा ठरतेय कुचकामी
By admin | Updated: August 26, 2014 01:38 IST