अनिकेत घमंडी ल्ल डोंबिवलीतीव्र वाहतूककोंडी सोडविण्यासाठी ठाकुर्ली स्थानकालगत रोड ओव्हर ब्रीज (उड्डाणपूल) बांधण्याच्या प्रस्तावाला रेल्वेची मान्यता मिळाली असून तांत्रिक कामे अंतिम टप्प्यात आहेत. त्याची पूर्तता झाल्यावर या प्रकल्पाच्या निविदा लवकरच काढण्यात येणार असल्याची माहिती कल्याण-डोंबिवली महापालिकेचे स्थायी समिती सभापती रमेश म्हात्रे यांनी ‘लोकमत’ला दिली. ठाकुर्लीच्या रेल्वे उड्डाणपुलासह पूर्व-पश्चिम एलिव्हेटेड मार्गासाठी केडीएमसीचा साधारणत: ४० कोटींचा हा महत्त्वपूर्ण प्रकल्प आहे. मध्य रेल्वेच्या ठाकुर्ली स्थानकालगतच्या रेल्वे फाटकाची समस्या जटील होत आहे. वाहतूककोंडी सोडविताना रेल्वेसह डोंबिवलीच्या वाहतूक विभागाच्या नाकीनऊ येत आहे. या ठिकाणी रुळांमधून वाहने वेळेत रेल्वे फाटकाच्या कालावधीत पुढे न गेल्याने रेल्वे वाहतुकीला प्रतिदिन ४० मिनिटांचा विलंब होत आहे. १३ कोटींचा उड्डाणपूल४या पुलासाठी सुमारे १३ कोटी खर्च अपेक्षित आहे. त्यापैकी सुमारे ६ कोटी भागीदारी तत्त्वावर मध्य रेल्वे देणार.ठाकुर्लीच्या रेल्वे उड्डाणपुलासह पूर्व-पश्चिम एलिव्हेटेड मार्गासाठी केडीएमसीचा साधारणत: ४० कोटींचा महत्त्वपूर्ण प्रकल्प आहे. त्यातील पहिल्या टप्प्याच्या निविदा पुढील आठवड्यात काढण्यात येणार आहेत. उड्डाणपुलाचे रेल्वे मार्गावरील काम रेल्वे प्रशासन करणार असून दोन्ही बाजूंच्या लँडिंगसह अन्य सर्व कामे महापालिका करणार आहे. - प्रमोद कुलकर्णी, प्रकल्प अभियंता, केडीएमसी४हजारो डोंबिवलीकरांसह ठाकुर्लीतील वाहनचालकांची गैरसोय दूर होणार असून या शहरांमधील वाहतूककोंडी सुटण्यास मदत होईल. या दोन्ही शहरांच्या पूर्व-पश्चिमेला जाणाऱ्या हजारो वाहनांची वर्दळ सातत्याने सुरू असते. वेळेवर फाटक न उघडल्याने डोंबिवलीतील मुंबई दिशेकडील रोड ओव्हर पुलावरून ये-जा करण्यासाठी वाहनचालकांना तब्बल दीड मैलाचा वळसा घालावा लागतो. ४शहरांतर्गत रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाची कामे सुरू असल्याने ठिकठिकाणी वाहतूककोंडी होत आहे. हा प्रस्ताव दोन वर्षांपासून रेंगाळला होता. उड्डाणपूल झाल्यास डोंबिवलीच्या एकमेव पुलावर पडणारा ताण कमी होईल. वाहतूक असुविधेमुळे अवजड वाहने, स्कूल बस, परिवहनची वाहतूक ठाकुर्लीत येणे टळते. परिणामी, डोंबिवलीतील ताण वाढतो.
केडीएमसीचा ठाकुर्लीत ४० कोटींचा प्रकल्प
By admin | Updated: June 4, 2015 22:32 IST