Join us

केडीएमसी स्थायीचे ८ सदस्य होणार निवृत्त

By admin | Updated: November 7, 2014 23:01 IST

कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या स्थायी समितीचे ८ सदस्य नोव्हेंबरअखेर निवृत्त होत आहेत.

कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या स्थायी समितीचे ८ सदस्य नोव्हेंबरअखेर निवृत्त होत आहेत. येत्या महासभेत नव्या सदस्यांची घोषणा होणार असल्याने रिक्त होणाऱ्या जागांवर वर्णी लावण्यात कोण सरस ठरतो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.स्थायीत एकूण १६ सदस्य आहेत. पक्षीय बलाबल पाहता शिवसेना ४, भाजपा १, मनसे ४, काँग्रेस आणि राष्ट्रवादी प्रत्येकी २ तर अपक्ष ३ सदस्य आहेत. या तीन अपक्षांपैकी दोघांचा सेनेला तर एका सदस्याचा राष्ट्रवादीला पाठिंबा आहे.दरम्यान, १६ सदस्यांपैकी ८ सदस्य निवृत्त होत आहेत. यात प्रमोद पिंगळे, शोभा पावशे, दुर्योधन पाटील, प्रकाश पेणकर, संजय पावशे, मनोज घरत, हर्षद पाटील, उषा वाळंज आदींचा समावेश आहे. केडीएमसीची सार्वत्रिक निवडणूक आॅक्टोबर २०१५ मध्ये होत आहे. त्यामुळे स्थायीत नव्याने नियुक्त केल्या जाणाऱ्या ८ सदस्यांसाठी केवळ ७ ते ८ महिन्यांचा कालावधी मिळणार आहे.